उद्यापासून बारावीच्या गुणपत्रिकांचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:20 IST2021-08-20T04:20:01+5:302021-08-20T04:20:01+5:30
नाशिक : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा २०२०-२१ परीक्षेचे गुणपत्रक व इतर साहित्य संबंधित उच्च माध्यमिक विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयांना ...

उद्यापासून बारावीच्या गुणपत्रिकांचे वाटप
नाशिक : उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा २०२०-२१ परीक्षेचे गुणपत्रक व इतर साहित्य संबंधित उच्च माध्यमिक विद्यालये व कनिष्ठ महाविद्यालयांना शुक्रवार (दि. २०) वितरित करण्यात येणार आहे, यात शुक्रवारी (दि. २०) केवळ नाशिकच्या वाटप केंद्रावर वितरण करण्यात येणार असून उर्वरित सर्व केंद्रांवरील वाटप शनिवारी (दि. २१) करण्यात येणार असल्याची माहिती नाशिक विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आले आहेत. विभागीय शिक्षण मंडळाने नियोजित केलेल्या वेळापत्रकानुसार, नाशिक कार्यालयात नाशिक शहर, नाशिक ग्रामीण, तसेच दिंडोरी, कळवण, इगतपुरी, निफाड, सिन्नर, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांचे वाटप गुरुवारी करण्यात येणार असून उर्वरित सर्व वाटप केंद्रांवर शनिवारी ११ ते ३ या वेळेत होईल.