दूध रस्त्यावर न फेकता गोरगरीबांना वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2020 14:00 IST2020-07-21T14:00:16+5:302020-07-21T14:00:47+5:30
पांडाणे -दिंडोरी तालुक्यातील पांडाणे परिसरात दुध दरवाढीसाठी कुठेही रस्त्यावर न टाकता प्रत्येक गावात जावून घरोघरी गरीब कुटूबांना वाटून रोष ...

दूध रस्त्यावर न फेकता गोरगरीबांना वाटप
पांडाणे -दिंडोरी तालुक्यातील पांडाणे परिसरात दुध दरवाढीसाठी कुठेही रस्त्यावर न टाकता प्रत्येक गावात जावून घरोघरी गरीब कुटूबांना वाटून रोष व्यक्त केला . स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे दूध बंद आंदोलन राज्यभर सकाळपासुनच सुरू झाले आहे . त्यात पांडाणे परिसरातील कार्यकर्त्यांनी दुध आणून रस्त्यावर न फेकता किंवा नासधूस न करता गोरगरीब बांधवांना घरोघरी वाटप केले. यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन कड यांच्यासमवेत कार्यकर्त्यांनी दूध वाटप केले. यावेळी पांडाणे, पुणेगाव , अंबानेर येथील कार्यकर्ते उपस्थित होते. .केंद्र शासनाने मागील महिन्यात दहा हजार टन दूध पावडर आयात करण्याचा निर्णय त्वरीत रद्द करावा, ३० हजार टन दूध पावडरचा बफर स्टॉक करावा, तसेच निर्यात अनुदान प्रति किलो ३० रूपये देण्यात यावे, दूध पावडर, तूप, बटर व इतर दुग्धजन्य पदार्थावरील जीएसटी पूर्णपणे रद्द करावा, पुढील तीन महिन्यासाठी राज्य सरकारने थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रतिलिटर अनुदान जमा करावे.या प्रमुख मागण्या केंद्र व राज्य शासनाकडे करण्यात आल्या आहेत.