कोटमगाव ते नागडे रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 22:38 IST2019-12-27T22:37:50+5:302019-12-27T22:38:16+5:30
येवला-औरंगाबाद रस्त्यावर रेल्वे उड्डाणपुलाच्या कामामुळे दुरवस्था झालेल्या कोटमगाव ते नागडे रस्ता खड्ड्यात गेला आहे. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी माजी सरपंच सुवर्णा पाखले यांच्या नेतृत्वाखालील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने ग्रामविकासमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कोटमगाव ते नागडे रस्ता दुरुस्तीच्या मागणीचे निवेदन छगन भुजबळ यांना देताना सुवर्णा पाखले.
येवला : येवला-औरंगाबाद रस्त्यावर रेल्वे उड्डाणपुलाच्या कामामुळे दुरवस्था झालेल्या कोटमगाव ते नागडे रस्ता खड्ड्यात गेला आहे. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी माजी सरपंच सुवर्णा पाखले यांच्या नेतृत्वाखालील ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने ग्रामविकासमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
नाशिक-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ७५२ वर सुमारे दोन -अडीच वर्षांपूर्वी उड्डाणपुलाचे काम चालू होते. यामुळे बाह्य वळणासाठी कोटमगाव ते नागडे हा पर्यायी रस्ता वापरण्यात आला होता. त्यामुळे गतकाळात अनेक जडवाहनांच्या वाहतुकीमुळे सदर रस्त्याचे प्रचंड नुकसान होऊन दुरवस्था झालेली आहे. उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतरही नागडे-कोटमगाव रस्त्याची अद्यापही दुरु स्ती झालेली नाही. त्यामुळे नागरिकांना व परिसरातील शेतकरी, यात्रेकरूंना दळणवळण्यासाठी अडचणी येत आहे. हा रस्ता प्रमुख जिल्हा मार्ग असूनही सादर रस्त्यावर मार्गस्थ होणे अत्यंत धोकादायक झाले आहे. अनेकदा अपघात होतात; मात्र वारंवार तक्र ार करूनदेखील रस्त्याचे डांबरीकरण किंवा दुरु स्ती झालेली नाही. याबरोबरच राष्ट्रीय महामार्गावर काही अडथळा निर्माण झाल्यास हाच रस्ता पुन्हा वापरला जाऊ शकतो, तरी रस्त्याचे डांबरीकरण लवकरात लवकर व्हावे, अशी मागणी निवेदनात केली आहे.