शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

जि. प. अध्यक्षपदाचे आरक्षण मंगळवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 01:36 IST

महापालिकेपाठोपाठ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण काढण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला असून, येत्या मंगळवारी (दि. १९) सकाळी ११ वाजता मंत्रालयात सोडत पद्धतीने आरक्षण काढण्यात येणार आहे.

नाशिक : महापालिकेपाठोपाठ जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचे आरक्षण काढण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला असून, येत्या मंगळवारी (दि. १९) सकाळी ११ वाजता मंत्रालयात सोडत पद्धतीने आरक्षण काढण्यात येणार आहे. नाशिक जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना शासनाने चार महिन्यांपर्यंत मुदतवाढ दिली होती. परंतु तत्पूर्वीच पदाधिकाऱ्यांची निवड होण्याची शक्यता व्यक्तकेली जात आहे.नाशिक जिल्हा परिषदेचे सध्याचे आरक्षण सर्वसाधारण महिला असल्यामुळे शीतल सांगळे यांना अध्यक्षपदाची संधी मिळाली. आता मंगळवारी कोणत्या प्रवर्गासाठी आरक्षण निघते याकडे साºयांचे लक्ष लागले आहे. आजवर निघालेली आरक्षणे पाहता, अनुसूचित जाती व जमाती तसेच सर्वसाधारण खुला अशा दोन प्रवर्गांना अलीकडच्या काळात संधी मिळालेली नाही. त्यामुळे आरक्षणावर डोळा ठेवून अनेकांनी गेल्या काही दिवसांपासूनच अध्यक्षपदासाठी आपली मनीषा बोलून दाखविली आहे. राज्यातील सत्तेची बदललेली समिकरणे व जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल पाहता, महाशिवआघाडीच्या हातात सत्ता राहण्याचे चिन्हे आहेत. सध्या जिल्हा परिषदेत शिवसेना, भाजप, कॉँग्रेस व राष्टÑवादी असा चौघांकडे सत्तेची पदे असून, शिक्षण व आरोग्य सभापती वगळता अध्यक्ष, उपाध्यक्ष व अन्य सभापतिपदांवर महिलांचीच वर्णी आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी महिलाच असल्यामुळे महिला राजचे वर्चस्व आहे. पुढच्या काळातही महिला राज राहते की काय याविषयी उत्सुकता लागून आहे.जिल्हा परिषदेच्या विद्यमान पदाधिकाºयांची मुदत २१ सप्टेंबरपर्यंत होती. परंतु चालू वर्षी लोकसभा व विधानसभा निवडणुकांमुळे पदाधिकाºयांना कामकाज करण्यास पुरेसा वेळ मिळाला नसल्याची बाब राज्यातील सर्वच जिल्हा परिषदेच्या पदाधिकाºयांनी शासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली होती. विधानसभा निवडणुका तोंडावर असल्यामुळे तत्कालीन राज्य सरकारने नाराजी नको म्हणून विद्यमान पदाधिकाºयांना चार महिन्यांसाठी म्हणजे २० जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली होती. विधानसभा निवडणुका आटोपून पदाधिकाºयांनी कामकाजास सुरुवात करताच, ग्रामविकास विभागाने आरक्षणाची सूचना काढली आहे. त्यामुळे आरक्षण निघाल्यानंतर कोणत्याही क्षणी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व पदाधिकाºयांची निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदElectionनिवडणूक