जि. प. सदस्य डि. के. जगताप यांच्यावर अज्ञातांचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 00:38 IST2021-03-23T22:21:58+5:302021-03-24T00:38:48+5:30

लासलगाव : येथील जिल्हा परीषदेचे सदस्य डि. के. जगताप यांच्या थेटाळे येथील फार्म हाऊसवर सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारासअज्ञात इसमांनी त्यांच्या फोर्ड इंडोनोर या गाडीच्या काचा फोडुन नुकसान करीत लाकडी दांडके खांद्यावर व मानेवर हल्ला करून जखमी केले. या प्रकरणी लासलगाव पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Dist. W. Member d. K. Unknown attack on Jagtap | जि. प. सदस्य डि. के. जगताप यांच्यावर अज्ञातांचा हल्ला

जि. प. सदस्य डि. के. जगताप यांच्यावर अज्ञातांचा हल्ला

ठळक मुद्देलासलगाव : फार्म हाऊसवर लाकडी दांडक्याने मारहाण : गाडीचेही नुकसान

लासलगाव : येथील जिल्हा परीषदेचे सदस्य डि. के. जगताप यांच्या थेटाळे येथील फार्म हाऊसवर सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारासअज्ञात इसमांनी त्यांच्या फोर्ड इंडोनोर या गाडीच्या काचा फोडुन नुकसान करीत लाकडी दांडके खांद्यावर व मानेवर हल्ला करून जखमी केले. या प्रकरणी लासलगाव पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोमवारी (दि.२२) रात्री नऊ-सव्वा नऊ वाजेच्या सुमारास जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर जगताप यांचे समवेत प्रकाश दायमा हे गेले असता फार्महाऊसवर ज्ञानेश्वर किसन जगताप हे फोर्ड इंडिओर गाडी (एम एच १५ एच सी ८५८५८) चालवत असताना ते त्यांच्या फार्महाऊसच्या आले मात्र तेथे फार्म हाऊसचा मुख्य दरवाजा बंद होतांना दिसला म्हणुन जगताप यांनी गाडीची काच खाली करुन फार्महाऊसवरील कामगारांना आवाज देत असतांना अचानक काही अज्ञात लोकांनी हातातील लाकडी दांडके घेवुन आरडा-ओरडा करीत जगताप यांच्यावर हल्ला केला. तसेच गाडीच्या देखील काचा फोडून गाडीचे नुकसान करीत पलायन केले. या हल्यात जगताप यांच्या उजव्या खांदा व मानेवर जखमा झाल्या आहेत. जगताप यांच्यावरील हल्याचे कारण समजू शकलेले नाही.
या प्रकरणी लासलगाव पोलिसांकडे प्रकाश मोतीलाल दायमा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार लासलगाव येथील पोलिस कार्यालयात तोंडास रुमाल बांधलेले, अंदाजे २५ ते ३० वयोगटातील, अंगात टी शर्ट व पॅन्ट घातलेले अनोळखी इसमाविरूध्द ( गुरनं कलम गुरनं १२९ । २०२१, भादवि कलम १४३, १४७, १४९, ३४१, ३२४, ४२७, ४४८ प्रमाणे) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निफाडचे पोलिस उपअधिक्षक सोमनाथ तांबे, लासलगावचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांनी तपास सुरू केली असुन संशयितांच्या शोधार्थ पोलिस पथके रवाना करण्यात आली आहेत. पोलिस उपनिरीक्षक आर. एस. सोनवणे अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Dist. W. Member d. K. Unknown attack on Jagtap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.