येवल्यातील विक्रेत्यांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 01:43 IST2018-04-28T01:43:31+5:302018-04-28T01:43:31+5:30

Dissolve to Yeola's Sellers | येवल्यातील विक्रेत्यांना दिलासा

येवल्यातील विक्रेत्यांना दिलासा

येवला : येथील शनि पटांगणासह भाजी मार्केट परिसर, गणेश मार्केटमागील भागात अतिक्रमण हवाट मोहीम राबवल्यानंतर सर्वसामान्य हातविक्रेत्यांसाठी शनि पटांगणावर समान जागा वाटपाचे सूत्र पालिकेने अवलंबले. शुक्र वारी सायंकाळी ६ वाजता पालिकेच्या मुख्य अधिकारी संगीता नांदूरकर यांनी निवडक अधिकाऱ्यांसह शनि पटांगण येथे भेळभत्ता व्यावसायिक, फळविक्र ेते, बांगडी विक्रेते, कपडे विक्री करणाºयांना जागांचे वाटप केले. शिवाय शनि पटांगण परिसरात वाहनतळासाठी जागा निश्चित करण्यात आली. विक्रेत्यांना जागावाटपाचे सीमांकन शनिवारी करण्यात असल्याचे मुख्याधिकारी नांदुरकर यांनी सांगितले. सीमांकनाबाहेर येऊ नका. आपल्याला नेमून दिलेल्या तात्पुरत्या जागेतच आपला व्यवसाय करा, असे मुख्याधिकारी यांनी जागा वाटपावेळी विक्रेत्यांना आवाहन केले. पुन्हा जागा मिळाली म्हणून अनेकांनी समाधान व्यक्त केले.

Web Title: Dissolve to Yeola's Sellers

टॅग्स :Nashikनाशिक