सिन्नर-शिर्डी महामार्गाच्या कामाबाबत नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:14 IST2021-05-08T04:14:29+5:302021-05-08T04:14:29+5:30
सिन्नर-शिर्डी महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून वावी गावातून सदर महामार्ग जात आहे. गावठाण हद्दीत महामार्गावर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. ...

सिन्नर-शिर्डी महामार्गाच्या कामाबाबत नाराजी
सिन्नर-शिर्डी महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून वावी गावातून सदर महामार्ग जात आहे. गावठाण हद्दीत महामार्गावर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. मात्र उड्डाणपुलाजवळ असणाऱ्या गटारीसाठी वापरण्यात येणारे पाईप मोठ्या प्रमाणात जमिनीच्या वर असल्याने गावातील गटारीचे पाणी व रहिवाशांचे पाणी या गटारातून जाणे शक्य नाही. गावातील व्यावसायिक भूखंड व घरे या महामार्गाच्या गटारीमुळे खड्ड्यात जात असल्याची तक्रार सरपंच कन्हैयालाल भुतडा, माजी सरपंच विजय काटे यांच्यासह उपस्थितीत ग्रामस्थांनी केली. गावातून बाहेर जाणाऱ्या गटारींचे महामार्गाच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर भूमिगत गटारींचे पाइप जमिनीपासून उंच असल्याने गावठाण हद्दीतील सांडपाण्याचा प्रश्न निर्माण होणार असल्याने सदर पाइप दोन फूट आणखी खाली बुजविण्याची मागणी विजय काटे यांनी केली.
इन्फो
गटारींचा पुन्हा होणार सर्व्हे
प्रकल्प संचालक भाऊसाहेब सांळुके, टेक्निकल मॅनेजर दिलीप पाटील यांनी ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेतल्या. या गटारींचा परत सर्व्हे करून लेव्हल तपासण्यात येईल, असे दिलीप पाटील यांनी सांगितले. यावेळी रस्त्याच्या व उड्डाणपुलाच्या कामाच्या दर्जाबाबत ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.
यावेळी अनंत मालपाणी, दिलीप कपोते, जगदीश पटेल, सर्वानंद नवले, रामराव ताजणे, अशोक वेलजाळी, सचिन वेलजाळी, विनायक घेगडमल, रामभाऊ संधान, बाबासाहेब घेगडमल, बापू काटे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो - ०७ सिन्नर-शिर्डी
सिन्नर-शिर्डी महामार्गाच्या वावी येथील उड्डाणपुलाच्या कामाजवळी गटारीच्या कामाची पाहणी करतांना प्रकल्प संचालक भाऊसाहेब सांळुके, टेक्निकल मॅनेजर दिलीप पाटील, विजय काटे, कन्हैयालाल भुतडा, रामराव ताजणे, विनायक घेगडमल, दिलीप कपोते, सचिन वेलजाळी, सर्वानंद नवले आदी.
===Photopath===
070521\07nsk_20_07052021_13.jpg
===Caption===
फोटो - ०७ सिन्नर-शिर्डीसिन्नर-शिर्डी महामार्गाच्या वावी येथील उड्डाणपुलाच्या कामाजवळी गटारीच्या कामाची पाहणी करतांना प्रकल्प संचालक भाऊसाहेब सांळुके, टेक्नीकल मॅनेजर दिलीप पाटील, विजय काटे, कन्हैयालाल भुतडा, रामराव ताजणे, विनायक घेगडमल, दिलीप कपोते, सचिन वेलजाळी, सर्वानंद नवले आदि.