शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग वापरकर्त्यांना नवीन वर्षात मोठे गिफ्ट! १ फेब्रुवारीपासून 'KYV' ची कटकट संपणार; NHAI चा मोठा निर्णय
2
एक चूक आणि बँक अकाउंट रिकामं! सायबर फसवणूक करणाऱ्यांच्या ५ पद्धती जाणून घ्या अन् काळजी घ्या
3
नैनीतालमध्ये गर्लफ्रेंडसोबत फिरत होता नवरा, अचानक समोर आली बायको; मग जे झालं...
4
१ फेब्रुवारी २०२६ पासून सिगरेट महागणार, कोणत्या Cigarette ची किती वाढणार किंमत?
5
निसर्गाचा कोप! अफगाणिस्तानात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार; १७ जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील ५ जण गाडले गेले
6
Indian Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,४२० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
7
२०२६चा पहिला गजकेसरी राजयोग: ८ राशींना सुबत्ता, पद-पैसा वाढ; लक्षणीय यश, ३ दिवस वरदान काळ!
8
एअर इंडियाच्या पायलटचा कॅनडात 'हायव्होल्टेज' ड्रामा; उड्डाणापूर्वीच झिंगला, मग जे घडलं ते धक्कादायक!
9
२०२६ची पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी: ३ गोष्टी करा, बाप्पा संकट दूर करेल; सगळे मनासारखे होईल!
10
कर महसुलात महाराष्ट्रच ‘किंग’; देशाच्या एकूण तिजोरीत २२% वाटा एकट्या महाराष्ट्राचा
11
‘फॅमिली फर्स्ट’! शिंदेसेनेच्या मुंबईतील उमेदवारांत नेत्यांच्या नातेवाईकांचाच भरणा; माजी आमदार चक्क नगरसेवक पदासाठी रिंगणात 
12
कर्जाच्या जाळ्यात अडकली तरुणाई, विना गॅरंटी कर्जाची थकबाकी वाढतेय; बँकांवर ताण - आरबीआय
13
फडणवीस-शिंदे यांचा उद्या मुंबईत संयुक्त मेळावा, मुंबई महापालिका निवडणूक प्रचाराचा नारळ फुटणार
14
ग्रंथदिंडीतून साहित्याचा जागर; तब्बल ५६ चित्ररथांच्या दोन किलोमीटर ग्रंथदिंडीने फेडले डोळ्याचे पारणे
15
आजचे राशीभविष्य २ जानेवारी २०२६ : नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी आजचा मुहूर्त उत्तम
16
महापालिका निवडणूक : मिशन 'थंड'खोरी! आमचे काय चुकले..? निष्ठावंतांचा सवाल
17
बंडोबांना थंड करून बिनविरोध निवडीचा नवा फंडा; मांडवली, पदांचे आमिष नाहीतर...; काही बंडखोर अज्ञात स्थळी रवाना 
18
‘मी कुठे चुकले, प्रश्न विचारण्याचा मला हक्क’; भाजपच्या इच्छुक उमेदवाराचा घरचा आहेर
19
‘शिंदेसेनेचे उमेदवार बिनविरोध यावे म्हणून विरोधकांचे उमेदवारी अर्ज करताहेत बाद’
20
मला मराठीचा आदर, मुंबईचा महापौर मराठीच होणार; भाजपनेते कृपाशंकर सिंह यांनी अखेर नमते घेतले
Daily Top 2Weekly Top 5

अडथळा हटवला; सिग्नल ‘लाल’च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 00:36 IST

राजीव गांधी भवनजवळील शांतारामबापू वावरे चौकामधील सिग्नलवरून नव्या पंडित कॉलनीत जाणारा रस्ता केवळ एकेरी वाहतुकीसाठी असल्याचे वाहतूक पोलिसांनी अधिसूचनेद्वारे जाहीर केले आहे; मात्र या सिग्नलवरील बॅरिकेड्स सोमवारी (दि.२) हटविल्याने वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला असे सर्वांनाच वाटले, मात्र केटीएचएमकडून येणाऱ्या वाहनांना दिवसभर ‘ग्रीन’ सिग्नल मिळालाच नाही त्यामुळे भंबेरी उडाल्याचे चित्र होते.

नाशिक : राजीव गांधी भवनजवळील शांतारामबापू वावरे चौकामधील सिग्नलवरून नव्या पंडित कॉलनीत जाणारा रस्ता केवळ एकेरी वाहतुकीसाठी असल्याचे वाहतूक पोलिसांनी अधिसूचनेद्वारे जाहीर केले आहे; मात्र या सिग्नलवरील बॅरिकेड्स सोमवारी (दि.२) हटविल्याने वाहनचालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला असे सर्वांनाच वाटले, मात्र केटीएचएमकडून येणाऱ्या वाहनांना दिवसभर ‘ग्रीन’ सिग्नल मिळालाच नाही त्यामुळे भंबेरी उडाल्याचे चित्र होते.केटीएचएम महाविद्यालया-जवळील लहान उड्डाणपुलापासून तरणतलावाकडे जाण्यासाठी नव्या पंडित कॉलनीमधील रस्ता मागील दोन महिन्यांपासून एकेरी करण्यात आला आहे. रस्ता अरुंद असल्याचे कारण देत शहर वाहतूक नियंत्रण शाखेने या रस्त्यावरील दुहेरी वाहतूक थांबविली. लोकांना हा नवा बदल लक्षात यावा, या उद्देशाने सिग्नलवर बॅरिकेड्स टाकून ‘त्या’ बाजूने येणाºया वाहनांची वाट अडविली गेली होती. या बाजूच्या वाहनाचालकांना असलेल्या सिग्नलवर डावे-उजवे व सरळ दिशेने जाणाºया मार्गावर बंदी असल्याची सांकेतिक चिन्ह स्पष्टपणे दिसतात आणि सिग्नलही लाल आहे, त्यामुळे नागरिकांनी वाहतूक नियम लक्षात घेऊन अज्ञान दूर करत या मार्गाचा दुहेरी वापर थांबवावा, असे शहर वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र बॅरिकेड्स हटविल्यामुळे सोमवारी या सिग्नलवर काही वेगळेच चित्र पहावयास मिळाले. पोलिसांनी बॅरिकेड उचलून नेले आणि नागरिकांनी रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला असा त्याचा सोईस्कर अर्थ लावला. यामुळे सिग्नलवर वाहतूक कोंडी दिवसभर होत होती.कारण उड्डाणपुलाकडून आलेली वाहने सिग्नल पुढे लाल असल्याने बॅरिकेड नसल्याने थांबून राहत होती आणि काही करेना सिग्नल हिरवा होत नसल्याने पुढील वाहनचालक वाहने पुढे नेत नव्हते. यामुळे एकापाठोपाठ वाहने उभी राहिल्याने पंडित कॉलनीत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.सुदैवाने अपघाताचा धोका टळलावाहनचालक डावीकडे वळण घेत सीबीएसकडे व काही उजवीकडे वळण घेत कॅनडा कॉर्नरकडे जाताना दिसून आले. या दोन्ही बाजूने जाणाºया वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन तर केलेच; मात्र वाहतूक कोंडीलाही निमंत्रण दिले. कारण त्यांचा सिग्नल हिरवा होत नाही तरीदेखील वाहनचालक पादचाºयांसाठी सिग्नलमध्ये सेट केलेल्या वेळेत चोरून आपली वाट मोकळी करून घेत होते. सुदैवाने दिवसभरात कुठलाही अपघात या चौकात घडला नाही, अन्यथा बॅरिकेड्स हटविल्याचा अनर्थ झाला असता, अशी चर्चा सुरू होती.‘अरे, आपला सिग्नल हिरवा कधी होईल’सीबीएस व कॅनडा कॉर्नरकडून येणाºया वाहनचालकांचा सिग्नल वेळोवेळी ‘ग्रीन’ होत होता आणि तरणतलाव सिग्नलकडून येणाºया वाहनांनाही नव्या पंडित कॉलनीकडे जाण्यासाठी ‘ग्रीन सिग्नल’ मिळत होता; मात्र केटीएचएमकडून आलेले वाहनचालक बॅरिकेड्स हटविल्यामुळे सिग्नलवर वाहने घेऊन उभी होती, कारण पुढे सिग्नल ‘लाल’ होता. यावेळी अनेकांच्या मुखातून ‘अरे, आपला सिग्नल हिरवा होतो की नाही...’ असे शब्द कानी पडले.

 

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस