खंडित वीजपुरवठ्याने जनजीवन विस्कळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:14 IST2021-07-30T04:14:30+5:302021-07-30T04:14:30+5:30
जिल्ह्याची मोठी बाजारपेठ, उद्योगनगरी म्हणून ओळख असलेल्या घोटी शहरात तर आता खंडित वीजपुरवठ्याने कळस गाठला आहे. गेल्या आठ ते ...

खंडित वीजपुरवठ्याने जनजीवन विस्कळीत
जिल्ह्याची मोठी बाजारपेठ, उद्योगनगरी म्हणून ओळख असलेल्या घोटी शहरात तर आता खंडित वीजपुरवठ्याने कळस गाठला आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून ही गंभीर समस्या भेडसावत आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता तसेच वीजपुरवठा खंडित झाल्यानंतरही गांभीर्याने न घेता तासनतास वीजपुरवठा खंडित राहतो. एक तर आधीच कोरोना स्थितीने उद्योजक, व्यावसायिक, कामगार वर्ग हतबल असताना आता आठ ते दहा दिवसांपासून खंडित वीजपुरवठ्याच्या गंभीर समस्येने हे सर्वच घटक त्रस्त झाले आहेत. सर्वच व्यवसाय, उद्योग ठप्प झाले असून रोजगाराचाही प्रश्न निर्माण झाला आहे. याबरोबरच पिण्याच्या पाण्याच्या वितरण व्यवस्थेवरही परिणाम झाला आहे.
इन्फो
नाराजीचा सूर
खंडित वीजपुरवठ्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शासकीय कामासाठी घोटीत येणाऱ्या नागरिकांना ऑनलाईन सेवा ठप्प, झेरॉक्स बंद, विजेवर आधारित यंत्रणा बंद असल्याने प्रवासखर्च करून रिकाम्याहाती परतावे लागत आहे. विकास कामांचे श्रेय घेणारे सर्वच संस्थांचे पदाधिकारी व लोकप्रतिनिधी मात्र या गंभीर समस्येबाबत गप्प आहेत. याबाबत नागरिकांत उलटसुलट चर्चा होत आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातूनही अनेक नागरिक, युवक आपल्या भावना व्यक्त करीत आहेत.
फोटो- २९ घोटी लाइट
290721\29nsk_16_29072021_13.jpg
फोटो- २९ घोटी लाइट