शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना आमदार आणि भुजबळ यांच्यात निधीवरून पेटला वाद, उच्च न्यायालयात दाखल केली याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2021 12:23 IST

नाशिक : नियोजन विभागाचा निधी पळविण्यावरून पालकमंत्री छगन भुजबळांच्या विरोधात दंड थोपटलेल्या शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी पुन्हा एकदा ...

नाशिक : नियोजन विभागाचा निधी पळविण्यावरून पालकमंत्री छगन भुजबळांच्या विरोधात दंड थोपटलेल्या शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी पुन्हा एकदा प्रहार केला आहे. भाई युनिव्हर्सिटीचे ते विद्यार्थी नसून प्राचार्य आहेत, अशी शेलकी टीका त्यांनी केली. पालकमंत्री पदावरून त्यांना दूर करण्याची मागणीही केली आहे. 

विशेष म्हणजे शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारीही पत्रकार परिषदेला उपस्थित असल्याने सेनेने भुजबळांच्या विरोधात आघाडी उघडल्याची चर्चा सुरू झाली आहे. दुसरीकडे भुजबळ यांनी पुन्हा एकदा आरोपाचे खंडन करताना मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात योग्य तो निर्णय होईल, असे सांगून आपल्या पुरता वादावर पडदा पडल्याचे सांगितले.

नांदगाव तालुक्याचे आमदार कांदे हे भुजबळ यांचे सुपुत्र पंकज भुजबळ यांना पराभूत करून निवडून आले असून गेल्या आठवड्यात पावसामुळे नुकसान भरपाईच्या वेळी निधीवरून भुजबळ आणि कांदे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. नंतर हा वाद जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत मिटल्याचे सांगण्यात आले. मात्र त्यानंतर कांदे यांनी निधीवरून उच्च न्यायालयात याचिका दाखल होती. त्याला दोन दिवस उलटत नाही तोच याचिकेमुळे छोटा राजन टोळीकडून धमकवण्यात आल्याचा आरोप कांदे यांनी केला होता. 

बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या किंवा त्यांच्यावर दाखल गुन्हा मागे घेण्यासाठी अटी-शर्ती घालणाऱ्यांविरोधात शिवसेना मैदानात राहणार असल्याचे कांदे म्हणाले. त्यावर शिवसेनाप्रमुखांच्या अटकेचा विषय मागे पडला. बाळासाहेब ठाकरे यांचाही राग गेला आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही राग नाही, मग यांनाच राग का असा प्रश्न भुजबळ यांनी केला. 

कांदे, छोटा राजनच्या पुतण्याला बजावणार समन्ससुहास कांदे यांना धमकी दिल्याप्रकरणी पोलीस आयुक्तालयाने गंभीर दखल घेतली असून, पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच कांदे यांच्यासह छोटा राजनचा पुतण्या आणि रिपाइं-आठवले गटाचे युवा प्रदेशाध्यक्ष अक्षय निकाळजे यांना शहर पोलिसांकडून जाबजबाब नोंदविण्यासाठी समन्स बजावण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

बालक पालकांचा वादशिवसेनेचे नेते आणि पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री  गुलाबराव पाटील यांनी बालकांनी पालकांप्रमाणे आणि पालकांनी बालकांप्रमाणे वागू नये, असा सल्ला दिला. त्यावर भुजबळ यांनीही बालकांनी नाराजी व्यक्त केली तर ती घरातच असावी चव्हाट्यावर वाद करू नये, असे सांगितले. मी कोणाला धमकी देत नाही, फार तर विनंती करतो. त्यामुळे याबाबत तथ्य नाही. हा भुजबळ विरुद्ध सेना असा संघर्ष नाही. आघाडीत अशा प्रकारचे आरोप- प्रत्यारोप योग्य नाही असं छगन भुजबळ म्हणाले.

टॅग्स :NashikनाशिकChhagan Bhujbalछगन भुजबळShiv Senaशिवसेना