शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

मनसेच्या कार्यालयातच खळ्ळखटॅक; नाशिक कार्यालयात नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 15:32 IST

या प्रकरणाची तक्रार संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्याला कामावरून कमी करून नाशिकरोडच्या पदाधिकाऱ्याला समज दिली

नाशिक : महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही त्यांच्या आक्रमक आंदोलनामुळे ओळखली जाते. एखादे आंदोलन केले मग त्यात खळ्ळखटॅक ठरलेला असतो. मात्र मनसेच्या कार्यालयात खळ्ळखटॅक झाल्याची बातमी समोर आली आहे. मनसेच्या कार्यालयात आलेल्या नाशिकरोडच्या एका पदाधिकाऱ्याने कार्यालयीन कर्मचाऱ्याला खुर्ची मागितल्याने झालेल्या वादावादीचे पर्यवसान हाणामारीत झाले. मनसेच्या कार्यालयातच खळ्ळखटॅक झाल्याने दिवसभर त्याचीच चर्चा रंगली होती. अखेरीस वरिष्ठ पदाधिकाऱ्यापर्यंत हे वादाचे प्रकरण गेल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्याला कामावरून कमी करण्यात आल्यानंतरच प्रकरण थंडावले.

मुंबईत नुकत्याच झालेल्या बैठकीला जाऊन हा पदाधिकारी परतला होता. त्याने कार्यालयात आल्यानंतर कर्मचाऱ्याला बाजूला होण्यास सांगितले; मात्र कर्मचाऱ्याने हातातील काम पूर्ण होईपर्यंत बाजूला जाण्यास नकार दिला. त्यावर पदाधिकाऱ्याने कामाची तातडी सांगूनदेखील न ऐकल्यावर कर्मचाऱ्याला कडक शब्दात समज दिली. त्यामुळे संतप्त झालेल्या कर्मचाऱ्याने दुरुत्तर दिल्याने पदाधिकारी आणि कर्मचाऱ्यात काही वेळ फ्री स्टाईल चकमक झाली. अखेरीस आजूबाजूच्या कार्यकर्त्यांनी दोघांना आवरले. दरम्यान, या प्रकरणाची तक्रार संघटनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी कर्मचाऱ्याला कामावरून कमी करून नाशिकरोडच्या पदाधिकाऱ्याला समज दिली; मात्र त्या कर्मचाऱ्याला काढून टाकण्यात आल्याने एका गटाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

टॅग्स :NashikनाशिकMNSमनसे