भगरीबाबांवर लघुपट प्रदर्शित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2019 18:18 IST2019-07-17T18:17:52+5:302019-07-17T18:18:00+5:30
लासलगाव : पंचक्रोशीतील भाविकांची उपस्थिती

भगरीबाबांवर लघुपट प्रदर्शित
लासलगांव : गुरूपोर्णिमेनिमित्त लासलगांव व पंचक्रशीतील नागरीकांचे आराध्यदैवत प. पू. भगरीबाबा यांचा लघुचित्रपट भगरीबाबा मंदिरात लासलगांव बाजार समितीचे सभापती जयदत्त होळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शित करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नानासाहेब चौधरी, बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे, सहाय्यक सचिव सुदीन टर्ले, माऊली बाबा, मधुकर सरोदे, संजय बिरार, प्रा. किशोर गोसावी आदी उपस्थित होते.
प. पू. भगरीबाबा हे साईबाबा, गजानन महाराज व श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या समकालीन संत असून लासलगांव व पंचक्रशीतील जनतेचे श्रध्दास्थान आहे. भावी पिढीला प. पू. भगरीबाबांची ओळख व्हावी यासाठी बाबांचा जीवनगाथा लघुचित्रपट तयार करण्यात आला. सदर लघुपटाचे दिग्दर्शन राहुल बनकर, पटकथा आणि संवाद लेखन शिवाजी विसपुते, छायाचित्रण सुदर्शन हिरे व गौरव भोईटे यांनी केले असुन प. पू. भगरीबाबा मित्र मंडळाने सदरचा लघुपट प्रस्तुत केलेला आहे. या लघपटासाठी जेऊघाले वस्तीचे ग्रामस्थ, लासलगांव बाजार समिती व पंचक्र शीतील ग्रामस्थांचे सहकार्य लाभले आहे. प. पू. भगरीबाबा यांचा जीवनगाथा लघुपटाच्या प्रिमियर शोसाठी लासलगांव व पंचक्र ोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.