मद्यविक्री दुकानाची टोळक्याकडून तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 01:02 IST2018-03-24T01:02:01+5:302018-03-24T01:02:01+5:30

मद्य पिण्याच्या कारणावरून मद्य दुकानाच्या मालकासोबत वाद घालून एका टोळक्याने दुकानातील लॅपटॉप, सीसीटीव्ही व साहित्याची तोडफोड केल्यानंतर दुकानास आग लावण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी (दि़ २१) रात्रीच्या सुमारास पंचवटीतील अमृतधाममध्ये घडली़

 Dispatch shop from liquor shops | मद्यविक्री दुकानाची टोळक्याकडून तोडफोड

मद्यविक्री दुकानाची टोळक्याकडून तोडफोड

नाशिक : मद्य पिण्याच्या कारणावरून मद्य दुकानाच्या मालकासोबत वाद घालून एका टोळक्याने दुकानातील लॅपटॉप, सीसीटीव्ही व साहित्याची तोडफोड केल्यानंतर दुकानास आग लावण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी (दि़ २१) रात्रीच्या सुमारास पंचवटीतील अमृतधाममध्ये घडली़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंचवटीतील हनुमाननगरमधील रहिवासी पद्मसिंह काळे यांचे बालाजी संकुलमध्ये मद्यविक्रीचे दुकान आहे़ बुधवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास संशयित दत्ता कुटे हा आपल्या सहा साथीदारांसमवेत आला़ या ठिकाणी दुकानमालक काळे व त्यांचा मावसभाऊ पंकज साळुंखे यांच्याशी वाद घालून कुटे व त्याच्या साथीदारांनी शिवीगाळ सुरू केली़ यानंतर दुकानाच्या काउंटरवरील वस्तू, लॅपटॉप व सीसीटीव्ही कॅमेरा फोडून नुकसान केले तसेच दुकानाच्या पुढील पडद्यावर रॉकेल टाकून आग लावली़  या प्रकरणी काळे यांच्या फिर्यादीवरून संशयित दत्ता कुटे व त्याच्या सहा साथीदारांविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title:  Dispatch shop from liquor shops