नाशिकरोड : येथील एका महिला उद्योजकाला व्यवसायाच्या कारणावरून जिवे मारण्याची धमकी देत विनयभंग केल्याप्रकरणी मुंबईतील एका पुरवठादाराविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पीडितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांची सिन्नरला एक कंपनी आहे. त्यासाठी कंपनीचे व्यवस्थापकांनी मुंबई कळंबोली येथील पुरवठादार संशयित विजय शहा यांच्याशी व्यवहार केला. पीडितेच्या कंपनीला स्टीलची गरज भासल्याने त्यांनी शहा यांच्याकडे मागणी नोंदवली. शहा यांनी वेळेत स्टील पुरवठा न केल्याने यांच्या कंपनीचा व्यवहार रद्द केला. त्यानंतर शहा पैशाची मागणी करत होता. पीडितेने दीड लाखांचा धनादेश त्याला दिला तरीही पुन्हा वेळोवेळी पैशांची मागणी करून तुमच्याकडून दहा लाख वसूल करनेच, अशी धमकीही त्याने दिल्याचे फिर्यादित म्हटले आहे. पैसे दिले नाही तर तुमच्या कुटुंबाला संपवून टाकेन, कंपनीला पेटवून देईल, अशा धमक्या दिल्या. स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल, असे शब्दप्रयोग करत विनयभंग केल्याची तक्रार पीडितेने पोलिसांकडे दिली आहे. पोलिसांनी या फिर्यादीवरून उपनगर पोलीस ठाण्यात संशयित शहा यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
महिला उद्योजकाचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 00:54 IST