गतिमंद अल्पवयीन नातीचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 13:06 IST2019-09-16T13:06:41+5:302019-09-16T13:06:55+5:30
सिन्नर: १४ वर्षीय गतिमंद मुलीचा चुलत आजोबानेच विनयभंग केल्याची घटना शनिवारी दि. १४ दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली.

गतिमंद अल्पवयीन नातीचा विनयभंग
सिन्नर: १४ वर्षीय गतिमंद मुलीचा चुलत आजोबानेच विनयभंग केल्याची घटना शनिवारी दि. १४ दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी वावी पोलीस ठाण्यात ६६ वर्षीय चुलत आजोबा विरोधात पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना तिचा विनयभंग केला. गतिमंद असल्याने या मुलीला कोणताही प्रतिकार करता आला नाही. नेमक्या वेळी तिचे वडील घरात आल्याने हा प्रकार उघडकीस आला. आपण पकडले जाऊ या भीतीने संशयित आजोबाने तेथून धूम ठोकली. मुलीच्या वडिलांच्या तक्र ारीवरून वावी पोलिसांनी विनयभंग व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपअधीक्षक माधव पिडले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक रणजित गलांडे याप्रकरणी तपास करीत आहेत.