राजापूर येथे जंतुनाशक फवारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 00:41 IST2021-05-10T23:25:26+5:302021-05-11T00:41:31+5:30

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर गावात ग्रामपंचायतीच्या वतीने प्रत्येक गल्लीत जंतुनाशक फवारणी करण्यात आली. राजापूर हे गाव मोठे असल्याने व येवला-नांदगाव रस्त्यावर असून गावात कोरोनाची साखळी तुटण्यास काही अंशी मदत झाली आहे.

Disinfectant spraying at Rajapur | राजापूर येथे जंतुनाशक फवारणी

राजापूर येथे जंतुनाशक फवारणी करताना कर्मचारी.

ठळक मुद्देराजापूर गावात जंतुनाशक औषध फवारणी

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर गावात ग्रामपंचायतीच्या वतीने प्रत्येक गल्लीत जंतुनाशक फवारणी करण्यात आली. राजापूर हे गाव मोठे असल्याने व येवला-नांदगाव रस्त्यावर असून गावात कोरोनाची साखळी तुटण्यास काही अंशी मदत झाली आहे.

कोविड १९ प्रादुर्भाव रोखण्यासाठी राजापूर गावात जंतुनाशक औषध फवारणी करण्यात येत आहे. या व्यतिरिक्त सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा सतत वापर यामुळे कोरोनाला रोखण्यात ग्रामस्थ यशस्वी ठरत आहेत. दरम्यान सोमवारी (दि.१०) गावात औषध फवारणी करताना उपसरपंच सुभाष वाघ, ग्राम विस्तार अधिकारी आर. एस. मंडलिक, आण्णासाहेब मुंढे, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर दराडे, दत्ता सानप, पप्पू बोडखे, साहेबराव वाघ व ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Disinfectant spraying at Rajapur