शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री संजय राठोडांच्या खात्यात बदल्यांमध्ये प्रचंड अनियमितता, कोट्यवधींचा ‘गेम’, अनेक अधिकारी कार्यकाळ संपल्यानंतरही खुर्चीवरच
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
'मला कुणीच लुटू शकत नाही, मीच सगळ्यांना लुटून आलीये'; हत्याकांडानंतर सोनमचा आईशी झालेला संवाद
4
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
5
कुटुंब पूर्ण झालं! सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, पतीही आहे लोकप्रिय अभिनेता
6
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
7
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
8
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
9
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
10
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
11
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
12
लोकलच्या दरातच एसी लोकल प्रवासाची सुविधा, मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले संकेत
13
मुंबईला राखीव साठ्यातून पाणी, जलसाठा १० टक्क्यांवर; मात्र तूर्तास पाणीकपात न करण्याचा महापालिकेचा निर्णय
14
अखेरच्या क्षणी मदत; ५ जणांना जीवनदान
15
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
16
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
17
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
18
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
19
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
20
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला

नाशिकमध्ये रोगराई सुरूच डेंग्युचे दीड शतक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 19:04 IST

नाशिक मध्ये अनेक ठिकाणी डेंग्यु रूग्ण आढळल्यानंतर महापालिकेच्या वतीने डास निर्मुलन फवारणी केली जाते. त्याच बरोबर घरांची तपासणी केली असता आजुबाजूच्या घरांमध्येच डास आढळतात. त्यामुळे महापालिकेने आता डासांची उत्पत्ती स्थळे ज्या घरात आढळतील, तेथे प्रति ठिकाण पाचशे रूपये दंड करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे.

ठळक मुद्दे स्वाईन फ्ल्यूचे १७ रूग्ण चिकनगुन्याचीही साथ

नाशिक  - शहरात पावसाळ्यामुळे जलजन्य आणि अन्य आजारांनी थैमान घातले असून गेल्या महिन्यात डेंग्युचे दीड शतक झाले आहे. याशिवाय स्वाईन फ्ल्यूचे १७ रूग्ण आढळले असून चिकनगुन्याच्या रूग्णांची संख्या चाळीस वर गेले आहे.

दरवर्षी पावसाळ्यात डासांमुळे डेंग्यु आणि चिकनगुन्याची साथ पसरते. यंदा जानेवारीपासून आत्तापर्यंत १ हजार १३३ डेंग्यूचे संशयीत रूग्ण आढळले असून त्यात ३६८ आत्तापर्यंतचे पॉझीटीव्ह रूग्ण आढळले आहेत. गेल्या महिन्यात १४८ रूग्ण आढळले आहेत. आत्तापर्यंत डेंग्युमुळे एकाचाही मृत्यू झाल्याची महापालिकेत नोंद नाही. मात्र, स्वाईन फ्ल्यु मुळे आत्तापर्यंत दोन रूग्ण दगावले आहेत. शहरात गेल्या महिन्यापासून आत्तापर्यंत १७ स्वाईन फ्लुचे रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे हे देखील महापालिकेसमोर आव्हान ठाकले आहे. याशिवाय चिकन गुनीयाचे आत्तापर्यंत ४० रूग्ण आढळले असून त्यापैकी २१ रूग्ण गेल्या महिन्यात आढळले आहेत.

महापालिकेच्या वतीने मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहिम हाती घेण्यात आली आहेत. विशेषत: डेंग्यु डासांच्या अळ्यांची उत्पत्ती रोखण्यासाठी एक लाख प्रबोधन पत्रे वाटण्यात आली आहेत. तसेच डासांची निर्मिती होत असलेल्या व्यावसायिकांना दंड ठोठावण्यात आला असून पेस्ट कंट्रोल च्या ठेकेदाराकडून कामात कुचराई झाल्याने त्याच्याकडून १ लाख ९३ हजार रूपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे. 

टॅग्स :NashikनाशिकNashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाHealthआरोग्यdengueडेंग्यू