कोरोनाची तिसरी लाट मुलांसाठी घातक असल्याने मुलांची काळजी घ्या... असे या ध्वनिफितीतून सांगण्यात येत आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी यातील जबाबदारीची जाणीव करून देणारे त्यात कथन आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी सार्वजनिक नियम, वैद्यकीय सुविधा, लसीकरण आदी पातळीवर शासन प्रयत्न करत आहे. त्यात लोकप्रतिनिधीही आघाडीवर आहेत. नांदगावचे आमदार यांनी कोरोनाच्या या भयाण संकटापासून सुरक्षित राहण्याचा सल्ला देणारी स्वत:ची एक ध्वनिफीत तयार केली आहे. कोरोनाची तिसरी लाट मुलांसाठी घातक असल्याने मुलांची काळजी घ्या... असे सांगण्यात येत होते. माझे कुटुंब माझी जबाबदारी यातील जबाबदारीची जाणीव करून देणारे ते कथन आहे. शिवाय आमदारांनी स्वत:चा मोबाइल क्रमांक जाहीर करून कोणती ही अडचण असल्यास संपर्क साधण्याचेही आवाहन केले आहे. आमदारांच्या आवाहनानंतर ‘हीच अमुची प्रार्थना हेच अमुचे मागणे’....‘माणसाने माणसाशी माणसासम वागणे’ या गाण्याच्या ओळी वाजविल्या जात आहेत. सदर ध्वनिफीत रिक्षात लावून ती गावभर फिरवली जात आहे.
आमदारांच्या आवाजातील ध्वनिफितीची चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:14 IST