राजापुरात उज्ज्वला दिनानिमित्त चर्चासत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 00:29 IST2018-04-21T00:29:06+5:302018-04-21T00:29:06+5:30
उज्ज्वला दिनानिमित्त राजापूरला एलपीजी पंचायतीचे आयोजन करून केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने ग्रामस्वराज्य अभियानाचा एक भाग म्हणून देशभरात उज्ज्वला दिवस राजापूर ग्रामपंचायत कार्यालयात साजरा करण्यात आला.

राजापुरात उज्ज्वला दिनानिमित्त चर्चासत्र
राजापूर : उज्ज्वला दिनानिमित्त राजापूरला एलपीजी पंचायतीचे आयोजन करून केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्रालयाने ग्रामस्वराज्य अभियानाचा एक भाग म्हणून देशभरात उज्ज्वला दिवस राजापूर ग्रामपंचायत कार्यालयात साजरा करण्यात आला. शिवकृपा इण्डेन ग्रामीण व्यवस्थापनाने चर्चासत्राचे आयोजन केले होते. एलपीजी वापर करणाऱ्या व वापर करू इच्छिणाºया महिलांसाठी ही पंचायत राबविण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येवला पं. स. सदस्य लक्ष्मीबाई गरुड व प्रमुख पाहुणे ग्रामपंचायतीचे उपसंरपच मीनाबाई अलगट, आरोग्य उपकेंद्राच्या सेविका प्रणिता व्हरके, बचतगटाच्या सुनीता बैरागी, ग्रामपंचायत सदस्य काशीनाथ चव्हाण, विकासोचे चेअरमन बबनराव वाघ, पी.के. आव्हाड, शंकरराव अलगट, संजय वाघ हे होते. सूत्रसंचालन समाधान चव्हाण व अरुण चव्हाण यांनी केले. गॅस वापर याविषयी दिनेश बैरागी, नीता भालके, भाऊसाहेब गरुड, पी.के. आव्हाड, प्रणिता व्हरके आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अनिल अलगट, युवराज वाघ, सचिन भालके, काकासाहेब चव्हाण, चेतन चव्हाण, ताई
भोरकडे, आशा दराडे, पुष्पा वाघ, मंदा बोडखे, रंजना भोरकडे, अलका वाघ, छाया वाघ, मीना वाघ, गीता सोनवणे, सरला मगर, मीरा वाघ यांच्यासह अंगणवाडी व आशा सेविका उपस्थित होत्या. राजापूर ग्रामपंचायतीचे ग्रामविस्ताराधिकारी आर. एस. मंडलिक यांनी आभार मानले.