शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

सरकारचे अपयश झाकण्यासाठी मुख्यमंत्री बदलाची चर्चा -पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 20:48 IST

खोटी व दिशाभूल करणारी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या सरकारला शेतीसह उद्योग, व्यवसाय क्षेत्रात कोणतीही विकासाची कामे करता आली नाहीत. त्यामुळे रोजगाराचा बिकट प्रश्न निर्माण झाला असून, त्यातूनच आरक्षणाच्या मागण्यांसाठी तरुण रस्त्यावर उतरत आहेत. राज्यातील भाजप सरकारला गेल्या चार वर्षांत कोणत्याही क्षेत्राला चालना देणारी विकासकामे करता आलेली नसून हे सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरल्याने सरकारचे अपयश झाकण्याठीच राज्यात मुख्यमंत्री बदलाची चर्चा होत असल्याचे सांगताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य व केंद्रातील भाजपा सरकारवर टीकेची झोड उठविली. 

ठळक मुद्देभाजपने खोटी अाश्वासने सत्ता मिळवलीअश्वासने पूर्ण करण्यात भाजपला अपयश अपयशामुळेच मुख्यमंत्री बदलण्याची चर्चा

नाशिक : खोटी व दिशाभूल करणारी आश्वासने देऊन सत्तेवर आलेल्या सरकारला शेतीसह उद्योग, व्यवसाय क्षेत्रात कोणतीही विकासाची कामे करता आली नाहीत. त्यामुळे रोजगाराचा बिकट प्रश्न निर्माण झाला असून, त्यातूनच आरक्षणाच्या मागण्यांसाठी तरुण रस्त्यावर उतरत आहेत. राज्यातील भाजप सरकारला गेल्या चार वर्षांत कोणत्याही क्षेत्राला चालना देणारी विकासकामे करता आलेली नसून हे सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरल्याने सरकारचे अपयश झाकण्याठीच राज्यात मुख्यमंत्री बदलाची चर्चा होत असल्याचे सांगताना माजी मुख्यमंत्रीपृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य व केंद्रातील भाजपा सरकारवर टीकेची झोड उठविली. नाशिक शहर व जिल्हा काँग्रेस कमिटीच्या मध्यवर्ती कार्यालयात रविवारी (दि. १२) काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. व्यासपीठावर माजीमंत्री शोभा बच्छाव, शहराध्यक्ष शरद आहेर, मविप्रचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, नगरसेवक शाहू खैरे, हेमलता पाटील, वत्सला खैरे, राजेंद्र बागुल आदी उपस्थित होते. यावेळी राज्य व केंद्रातील भाजपाच्या सरकारच्या अपयशाचा पाढा वाचताना पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट राज्यात व केंद्रात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे आरोप केले. देशातील नाशिकसह बंगळुरू, कोरापूट, कोरवा आदी सार्वजनिक क्षेत्रातील विमान निर्मिती करणाºया कारखान्यांना डावलून संरक्षण क्षेत्रातील कोणताही अनुभव नसलेल्या अनिल अंबानी यांच्या कंपनीला विमान निर्मितीचे काम देण्यात आले. विशेष म्हणजे यूपीए सरकारने ५७० कोटी रुपयांना एक राफेल विमान खरेदीचा व्यवहार केलेला असताना केंद्र सरकारने त्याच विमानाची खरेदी करताना एका राफेल विमानासाठी जवळपास १६७० कोटी रुपये मोजून प्रत्येक विमानामागे सुमारे एक हजार कोटी रुपये अधिक दिले आहेत. त्यामुळे ३६ विमानांच्या खरेदीत ३६ हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला असून, हा संरक्षण क्षेत्रातील आतापर्यंतचा सर्वात मोठा भ्रष्टाचार असल्याचा आरोपही पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. त्याचप्रमाणे सरकारने शेतीविषयक चुकीचे आयात-निर्यात धोरण राबवून शेतीमालाचे भाव पाडल्याने शेतकºयांना रस्त्यावर उतरावे लागले. तसेच तरुणांना नोकºया देण्याचे खोटे आश्वासने देऊन सत्ता प्राप्त केल्यानंतर नोटबंदी आणि जीएसटीसारखे निर्णय घेऊन त्यांची चुकीच्या पद्धतीने अंमलबजावणी केली. त्यामुळे उद्योग, व्यवसाय क्षेत्रात त्याचा विपरीत परिणाम होऊन तरुणांना नवीन नोकºया मिळण्याऐवजी आहे त्याही नोकºया संकटात आल्याने तरुणांनाही रस्त्यावर उतरण्याची वेळ आल्याची टीका चव्हाण यांनी केली. 

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणNashikनाशिकcongressकाँग्रेसChief Ministerमुख्यमंत्रीprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस