शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

‘साईड ब्रँच’च्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये असंतोष

By admin | Updated: January 31, 2016 23:13 IST

महासंचालकांकडे तक्रार : जाणीवपूर्वक दुर्लक्षाचा आरोप

नाशिक : पोलीस खात्यात यापूर्वी साईड ब्रँच काम केल्यानंतर शहर पोलीस आयुक्तालयात बदली झाल्यानंतर पुन्हा साईड ब्रँचला फेकण्यात आल्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे़ पोलीस आयुक्त व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक अन्याय केला जात असल्याची भावना या अधिकाऱ्यांमध्ये असून, त्यातील काहींनी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांच्याकडे पत्रव्यवहार करून त्यांची वेळ मागून घेतल्याचे वृत्त आहे़पोलीस आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून दिली जाणारी अपमानास्पद वागणूक व आर्थिक निकषांवर बदल्या केल्या जात असल्याचे साईड ब्रँचमधील अधिकारी उघडपणे बोलू लागले आहेत़ तसेच यापूर्वीही आम्ही पोलीस ठाणी सांभाळली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांना अभिप्रेत असलेली वसुली आम्हीदेखील करून देऊ शकतो, असे स्पष्टपणे सांगत असून, यातील काहींनी पोलीस महासंचालक कार्यालयाकडे पत्रव्यवहारही केला आहे़ सिंहस्थानंतर पोलीस आयुक्तालयातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत़ त्यामध्ये पंचवटी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक शांताराम अवसारे यांनी विशेष शाखेत, तर विशेष शाखेतील प्रकाश सपकाळे यांची पंचवटी पोलीस ठाण्यात बदली करण्यात आली़ तसेच शहरात नव्याने स्थापन झालेल्या मुंबई नाका व म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी बाजीराव महाजन व नरेंद्र पिंगळे यांची नियुक्ती करण्यात आली़सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी यांची प्रकृती अस्वास्थ्यामुळे वाचक शाखेत, तर त्यांच्या जागेवर पुण्याच्या गुन्हे अन्वेषण विभागातून बदलून आलेले पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांची नियुक्ती करण्यात आली़ पोलीस आयुक्तांनी या बदल्यांमध्ये साईड ब्रँचमधील पोलीस अधिकाऱ्यांचा विचारच न केल्यामुळे त्यांच्यामध्ये असंतोषाचे वातावरण आहे़ विशेष म्हणजे सद्यस्थितीत साईड ब्रँचमध्ये कार्यरत असलेल्या या पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतंत्र पोलीस ठाण्याचा कारभारही सांभाळलेला आहे़ (प्रतिनिधी)