नांदूरमधमेश्वरमधून ९६६७ क्यूसेकचा विसर्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:13 PM2021-07-30T16:13:27+5:302021-07-30T16:13:41+5:30

सायखेडा : दारणा आणि गंगापूर धरणातून गोदावरी नदीला पाणी सोडल्याने गोदावरीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून, पूरपरिस्थिती निर्माण होऊ ...

Discharge of 9667 cusecs from Nandurmadhameshwar | नांदूरमधमेश्वरमधून ९६६७ क्यूसेकचा विसर्ग

नांदूरमधमेश्वरमधून ९६६७ क्यूसेकचा विसर्ग

Next

सायखेडा : दारणा आणि गंगापूर धरणातून गोदावरी नदीला पाणी सोडल्याने गोदावरीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली असून, पूरपरिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून नांदूरमधमेश्वर धरणातून ९६६७ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे तूर्तास गोदाकाठ भागातील पूरपरिस्थितीचा धोका टळला आहे.
इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, नाशिक तालुक्यात चार दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे. पावसाच्या माहेरघरी पाऊस पडत असल्यामुळे त्या परिसरातील धरणाच्या पाण्यात वाढ झाली आहे. दारणा धरणातून ५५४० आणि गंगापूर धरणातून ३०६८ इतक्या पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीच्या पात्रात काल दुपारी सोडण्यात आल्याने गोदावरी नदीच्या पाण्यात वाढ झाली. गोदाकाठ भागात पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे नांदूरमध्यमेश्वर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग गोदावरी नदीच्या पात्रात सोडण्यात आला आहे.

----------------------------
पुराचा धोका टळला

गोदावरी नदीच्या पाण्यात वाढ झाली की सायखेडा, चांदोरी, शिंगवे, करंजगाव, चाटोरी, चापडगाव, मांजरगाव, काथरगाव, दिंडोरी चास, कोठुरे, गोंडेगाव या गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसतो. सगळीकडे पाणी पसरते आणि शेतातील पिके पाण्याखाली येतात. पाणी काही महिने कमी होत नाही. त्यामुळे हाती आलेले पीक वाया जाते असे अनेक वर्ष सातत्याने घडते. त्यामुळे धरणात साचलेला गाळ काढून गेटची संख्या वाढवणे गरजेचं आहे. म्हणजे पूर पाण्याचा फटका शेतीला बसणार नाही आणि गाव पाण्याखाली येणार नाहीत. गोदाकाठ भागात पाऊस पडत नसल्याने केवळ इतर धरणांतून येणाऱ्या पाण्यामुळे विसर्ग वेळेत सोडल्याने पुराचा धोका टळला आहे. अन्यथा यंदाचा पहिला पूर गोदाकाठ भागात आला असता असे जाणकार सांगतात.
-----
गोदावरी नदीच्या पात्रात नांदूरमधमेश्वर धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. त्यामुळे धरणाच्या गेटजवळ पाणी कमी जाते. जास्त पाण्याचा फ्लो मागे राहातो. त्यामुळे गोदाकाठला पूरपरिस्थिती निर्माण होते, शेती पाण्यात अनेक महिने राहिल्याने नुकसान होते.

- गोकुळ गिते, माजी संचालक, पिंपळगाव बाजार समिती

Web Title: Discharge of 9667 cusecs from Nandurmadhameshwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक