फरशी पूल तुटल्याने गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 23:06 IST2019-11-14T23:05:53+5:302019-11-14T23:06:41+5:30
मनमाड : शहरातील रामगुळणा पांझण नदीला आलेल्या पुरामुळे बुरकूलवाडी भागाकडे जाणारा फरशी पूल तुटल्याने या भागातील नागरिकांचा शहराशी संपर्क तुटला आहे. या पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

मनमाड येथे एचएके हायस्कूलमागे पांझण नदीवरील फरशी पुलाची झालेली दुरवस्था.
लोकमत न्यूज नेटवर्क
मनमाड : शहरातील रामगुळणा पांझण नदीला आलेल्या पुरामुळे बुरकूलवाडी भागाकडे जाणारा फरशी पूल तुटल्याने या भागातील नागरिकांचा शहराशी संपर्क तुटला आहे. या पुलाची लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
नुकतेच पांझण रामगुळणा नदीला आलेल्या पुरामुळे शहरात मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये एचएके हायस्कूलच्या मागच्या बाजूला शहरातून बुरकूलवाडी, कीर्तिनगर, सिकंदरनगर, माउलीनगर, डॉ. आंबेडकरनगर भागाला जोडणारा फरशी पूल तुटला आहे. या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने या भागातून शहराकडे येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे.
तीस ते पस्तीस वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या पुलाची सध्या दुरवस्था झाली असून, प्रशासनाने तत्काळ लक्ष घालून या पुलाची उंची वाढवून दुरुस्ती करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर शिवसेनेचे शहर उपप्रमुख खालीद शेख, शरीफ राठोड, फिरोज खान, शब्बीर तांबोळी, नदिम शेख, जहीर शेख, रमेश खरे, राजेंद्र व्यवहारे, संजय बनकर, सुभाष साळवे, आरिफ शेख, अशोक चौधरी, मोहसीन शेख, असलम शेख आदी नागरिकांच्या स्वाक्षºया आहेत.मुख्यत: या भागातून एचएके हायस्कू लकडे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी येत असतात. सध्या या पुलावर पाणी असल्याने नागरिक व विद्यार्थ्यांना मोठा फेरा मारून महामार्गाने यावे लागते. यामुळे चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.