दिव्यांगांना रेल्वे आरक्षण कार्यालयातून मिळणार ओळखपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 22:28 IST2020-06-24T22:20:27+5:302020-06-24T22:28:09+5:30
नाशिकरोड : मनमाड, जळगाव, धुळे, मलकापूर, अकोला, अमरावती, खंडवा, बुºहाणपूर, नाशिकरोड येथील रेल्वे आरक्षण कार्यालयांत दिव्यांगांना सवलत ओळखपत्र दिले जाणार आहे.

दिव्यांगांना रेल्वे आरक्षण कार्यालयातून मिळणार ओळखपत्र
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिकरोड : मनमाड, जळगाव, धुळे, मलकापूर, अकोला, अमरावती, खंडवा, बुºहाणपूर, नाशिकरोड येथील रेल्वे आरक्षण कार्यालयांत दिव्यांगांना सवलत ओळखपत्र दिले जाणार आहे. ओळखपत्र मिळविण्यासाठी दिव्यांगांना विभागीय कार्यालयात यावे लागत होते. मात्र सध्याच्या परिस्थितीचा विचार करता ओळखपत्र देण्याची सुविधा रेल्वे प्रशासनाने जवळच्या आरक्षण कार्यालयांत केली आहे.
दिव्यांगांना नाशिक, मनमाड, जळगाव, धुळे, मलकापूर, अकोला, अमरावती, खंडवा, बुºहाणपूर या स्थानकांच्या आरक्षण कार्यालयांतून कार्ड दिले जाणार आहे. मंडल कार्यालयाव्दारे फोनवर कळविल्यानंतर दिव्यांग व्यक्ती त्यांच्या मूळ कागदपत्रांसह त्या स्टेशनच्या आरक्षण कार्यालयात जाऊन त्यांचे कार्ड घेऊ शकतात, असे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.