अंकाई-टंकाई किल्ल्यावर दीपोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2020 01:19 IST2020-11-19T23:08:53+5:302020-11-20T01:19:22+5:30
जळगाव नेऊर : गुलामगिरीच्या अंधकारात खितपत पडलेल्या रयतेला स्वराज्याचा प्रकाश देत तिमिराकडून तेजाकडे नेणाऱ्या शिवरायांच्या चरणी नतमस्तक होत पराक्रमी मावळ्यांच्या चरणी मुजरा करण्यासाठी ह्यस्वराज्य इतिहासाच्या पाऊलखुणा परिवाराच्याह्ण वतीने ह्यएक पणती दुर्गालाह्ण या उपक्रमाअंतर्गत येवला तालुक्यातील अंकाई-टंकाई किल्ल्यावर रविवारी (दि.१५) सायंकाळी असंख्य शिलेदारांच्या सोबतीने दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

परिवाराच्या वतीने सण-उत्सव हे मराठ्यांच्या शौर्यशाली पराक्रमाची साक्षीदार असणाऱ्या दुर्गावरती साजरा करण्यात येतात. या वर्षीचा दुर्ग दीपोत्सवाची सुरुवात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वती खबरदारी घेत नाशिक प्रभागाचे श्याम गव्हाणे यांच्या हस्ते गडदेवतेचे पूजन करून करण्यात आले.
यावेळी पेशवेकालीन सतीमाता मंदिर, लक्ष्मी-माता मंदिर व अंकाई लेणी परिसर, टंकाई येथील पुरातन महादेव मंदिर येथे दिवे प्रज्वलित करण्यात आले, तर लेणी परिसरातील शिवराय मूर्तिपूजन बाळासाहेब झाल्टे यांच्या हस्ते पार पडले.
किल्ल्याच्या प्रवेशद्वाराला आकाशकंदील, फुलांचे तोरण आणि पणत्यांची आकर्षक आरास करण्यात आली होती. प्रवेशव्दाराजवळील शिवरायांचे विधिवत मूर्ती पूजन बालशिलेदार साई आरगडे, अनिकेत जाधव आणि बाल शिवव्याख्याते ओमकार थोरात यांच्या हस्ते पार पडले. भगव्या भंडाऱ्याची उधळण, कुणाल तळेकरच्या शिवगर्जनेने आणि शिव घोषाने अंकाई-टंकाई परिसर निनादून निघाला होता. तेज आर्ट क्रिएशनच्या संचालक अर्चना शिंदे, तेजस्विनी शिंदे आणि शुभम बेळे यांनी आकर्षक रांगोळी काढली होती.
यावेळी शिवव्याख्याते प्रा. दीपकराजे देशमुख यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, हा दीपोत्सव सोहळा म्हणजे तिमिराकडून तेजाकडे नेणारा, नवचैतन्य निर्माण करणारा आहे. दिवाळीच्या पर्वात आपण अभ्यंगस्नान करतो, अभंग्यस्नानमुळे बाह्यअंग साफ होते; पण आपलं अंतकरण ही शुद्ध होणं गरजेचं आहे. यासाठी आपण शिवरायांच्या चरणी एक पणती लावताना त्याग, समर्पण आणि शुद्ध आचारणाची शपथ प्रत्येकाने घेतली पाहिजे. आपल्या प्रत्येकाच्या हृदयातील तो दिवा अजूनही पेटला नाही, जेव्हा तो शिवविचाराच्या शिवतेजाने पेटेल तेव्हा कुठे खऱ्या अर्थाने आपला दीपोत्सव साजरा होईल.
दीपोत्सवास सोमनाथ गव्हाणे, विजय महाले, सुनील बोराडे, नाना जाधव, स्वप्निल वाळुंज, किरण कापसे, समाधान कदम आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.