दिंडोरी तहसीलदारांचा वाळूमाफियांना दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:22 IST2021-02-23T04:22:04+5:302021-02-23T04:22:04+5:30
तहसीलदार पंकज पवार यांनी ८ नोव्हेंबर २०२० रोजी वाळूची परवानापेक्षा अधिक क्षमतेने वाहतूक करणारे सात ट्रक पकडले होते. हे ...

दिंडोरी तहसीलदारांचा वाळूमाफियांना दणका
तहसीलदार पंकज पवार यांनी ८ नोव्हेंबर २०२० रोजी वाळूची परवानापेक्षा अधिक क्षमतेने वाहतूक करणारे सात ट्रक पकडले होते. हे सात ट्रक जप्त करत २७ लाख रुपये दंड आकारला होता; मात्र दंडाची रक्कम ट्रकमालक भरण्यास तयार नसल्याने आता १ मार्च २०२१ रोजी ट्रकचा लिलाव करून दंड वसूल करणार असल्याचे पवार यांनी सांगितले. दिंडोरी तालुक्यात कादवा नदी पात्रातून वाळूची नेहमीच तस्करी होते, तसेच लगतच्या नाशिक-पेठ रस्त्यावर वाळुची सर्वाधिक तस्करी होते. याची माहिती घेत कारवाई करण्यात आली होती; मात्र ट्रकमालकांना दंडाची रक्कम भरणेबाबत आदेश देऊनही रक्कम भरणा न केल्याने आता थेट वाहनांचा लिलाव करून दंडाची रक्कम वसूल केली जाणार आहे. तालुक्यात ही पहिलीच घटना असल्याने वाळू माफियांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
फोटो- २२दिंडोरी तहसील
===Photopath===
220221\22nsk_21_22022021_13.jpg
===Caption===
फोटो- २२दिंडोरी तहसील