शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

दिंडोरी तालुक्यात पेरण्यांची लगीनघाई सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 00:15 IST

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सध्या पावसाला सुरुवात झाल्याने बळीराजा सुखावला असून आता खरीप हंगामातील पेरण्यांची तालुक्यात लगीनघाई सुरू झाली आहे.

ठळक मुद्देपावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला

लखमापूर : दिंडोरी तालुक्यात सध्या पावसाला सुरुवात झाल्याने बळीराजा सुखावला असून आता खरीप हंगामातील पेरण्यांची तालुक्यात लगीनघाई सुरू झाली आहे.मे महिन्याच्या शेवटी व जूनच्या पहिल्या आठवड्यात जोरदार पाऊस झाला. त्यामुळे खरीप हंगामातील पेरणीपूर्व मशागतीची कामे शेतकरी वर्गाने यांत्रिकी साधनांनी पूर्ण करून घेतली होती. त्यानंतर पावसाने लहरीपणा दाखवत दडी मारण्यास सुरुवात केली. त्यामुळे बळीराजाच्या या लगीनघाईला यामुळे आडकाठी निर्माण झाली.

कारण जमिनीतील पेरणीला जी ओल पाहिजे ती प्रमाणापेक्षा कमी होती. त्यामुळे अतिशय महागडे बियाणे खरेदी करून पेरणीचा वापसा नसल्यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला. आता दोन दिवसांपासून तालुक्याच्या बहुतेक भागात पावसाला सुरुवात झाल्याने पुन्हा बळीराजाची पेरणीसाठी धावपळ सुरू झाली आहे.

यंदाच्या हंगामात बहुतेक शेतकरी पारंपरिक पिकांना फाटा देत नवीन पिके घेण्यावर भर देत आहेत. सध्या सोयाबीन, मका व वेगवेगळ्या स्वरूपांचा भाजीपाला इ. पिकांकडे मोठ्या प्रमाणावर कल पाहायला मिळत आहे. आता दोन दिवसांपासून पावसाने सुरुवात केल्याने पुन्हा खरीप हंगामातील पेरण्यांना वेग आला आहे.बाजरीकडे फिरविली पाठदिंडोरी तालुक्यातून बाजरी पीक नामशेष होण्याच्या मार्गावर दिसत आहे. मागील हंगामात शेतकरी वर्गाने बाजरी पीक अल्प प्रमाणात घेतले होते. कारण बहुतेक भागात उन्हाळ बाजरी घेतली जाते. त्यामुळे खरीप हंगामात बाजरी ही कमी प्रमाणात घेतली जाते.यंदाच्या खरीप हंगामात नगदी भांडवल उपलब्ध करून देणाऱ्या पिकांची निवड शेतकऱ्यांकडून केली जात आहे. कारण कोरोनामुळे सध्या भांडवलाची कमतरता जाणवू लागल्याने कमी खर्च लागणाऱ्या भाजीपाला पीक घेण्याकडे आमचा कल आहे. त्यात वांगी, कोबी, वाल, टमाटे व इतर भाजीपाल्याचा समावेश आहे.- दिलीपराव सोनवणे, शेतकरी, लखमापूर

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती