दिंडोरी तालुक्याला सर्वसाधारण जेतेपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 00:37 IST2020-02-12T00:36:06+5:302020-02-12T00:37:33+5:30

जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेत दिंडोरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांनी दाखविलेल्या उत्कृष्ट कलागुणांमुळे या स्पर्धेतील सर्वसाधारण जेतेपद दिंडोरी तालुक्याला बहाल करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांचे सर्वच क्षेत्रातील योगदान पाहता, राज्य व राष्टÑीय स्तरावरील खेळाडू निर्माण होतील, असा आशावाद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी व्यक्त केला. यावेळी विजेते स्पर्धक व खेळाडूंचाही सन्मान करण्यात आला.

Dindori taluka has general victories | दिंडोरी तालुक्याला सर्वसाधारण जेतेपद

जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेत सर्वसाधारण जेतेपद पटकाविणाऱ्या दिंडोरीच्या विजेत्यांसमवेत अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, सयाजीराव गायकवाड, सुरेखा दराडे, वैशाली झनकर आदी.

ठळक मुद्देजिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा विजेते स्पर्धक, खेळाडूंना पारितोषिक वितरण

नाशिक : जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धेत दिंडोरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांनी दाखविलेल्या उत्कृष्ट कलागुणांमुळे या स्पर्धेतील सर्वसाधारण जेतेपद दिंडोरी तालुक्याला बहाल करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांचे सर्वच क्षेत्रातील योगदान पाहता, राज्य व राष्टÑीय स्तरावरील खेळाडू निर्माण होतील, असा आशावाद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी व्यक्त केला. यावेळी विजेते स्पर्धक व खेळाडूंचाही सन्मान करण्यात आला.
येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे मंगळवारी या स्पर्धेचा समारोप करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून उपाध्यक्ष सयाजीराव गायकवाड, शिक्षण सभापती सुरेखा दराडे, पंचायत समितीच्या सभापती शिवा सुरासे हे होते. यावेळी स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला.
यावेळी अध्यक्षांच्या हस्ते इन्स्पायर अवॉर्ड स्पर्धेत राष्टÑीय स्तरावर निवड झालेल्या इगतपुरी तालुक्यातील खैरगाव येथील शिक्षक व विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. तसेच शासकीय कन्या शाळेच्या खो-खो मधील राष्टÑीय स्तरावर सुवर्ण पदक प्राप्त करणाºया तीन विद्यार्थिनींचाही सत्कार करण्यात आला.
शिक्षण विस्तार अधिकारी आर. डी. जोशी यांचादेखील सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष सयाजीराव गायकवाड, सभापती सुरेखा दराडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास बी. डी. कनोज, सरोज जगताप, नीलेश पाटोळे, प्रमोद चिंचोले, सी. बी. गवळी, धनंजय कोळी, विजय पगार, सुभाष भालेराव, राजीव लहामगे, सुनीत जाधव, सुषमा घोलप, आर. आर. बोडके यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.
विविध स्पर्धांचे विजेते
समूह नृत्य स्पर्धेत कळवण येथील मुलींच्या शाळेला तसेच द्वितीय म्हसगण या शाळेला तर समूह गीत गायन स्पर्धेत पिंपरी सय्यद या शाळेला प्रथम व जातेगावच्या शाळेला द्वितीय पारितोषिक मिळाले. मोठ्या गटात खो-खो स्पर्धेत देवलदरी शाळेला पहिले, तर पिंप्रज या मुलांच्या शाळेला द्वितीय पारितोषिक मिळाले. मुलींच्या स्पर्धेत कुळवंडी प्रथम तर करवंदे शाळेला द्वितीय क्रमांक मिळाला. यासह प्रत्येक व्यक्तिगत व सामूहिक स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव करण्यात आला.

Web Title: Dindori taluka has general victories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.