दिंडोरी येथील उद्योजक अपघातात ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2017 00:33 IST2017-08-18T00:33:07+5:302017-08-18T00:33:13+5:30

दिंडोरी : नाशिक- कळवण रस्त्यावर रणतळ परिसरात नाशिकहून दिंडोरीकडे येणाºया गाडीचे टायर फुटून गाडी झाडावर धडकल्याने झालेल्या अपघातात दिंडोरी येथील युवा उद्योजक अजिंक्य राजे ठार झाले.

Dindori industrialists killed in accident | दिंडोरी येथील उद्योजक अपघातात ठार

दिंडोरी येथील उद्योजक अपघातात ठार

दिंडोरी : नाशिक- कळवण रस्त्यावर रणतळ परिसरात नाशिकहून दिंडोरीकडे येणाºया गाडीचे टायर फुटून गाडी झाडावर धडकल्याने झालेल्या अपघातात दिंडोरी येथील युवा उद्योजक अजिंक्य राजे ठार झाले.
दिंडोरी येथील उद्योजक अजिंक्य संजय राजे (२८) हे बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास नाशिकहून दिंडोरीला स्कॉर्पिओ क्र . एमच १५ बीएक्स १५२० गाडीने येत असताना हॉटेल राजयोग जवळील उताराला गाडीचे मागील टायर फुटून त्यांची गाडी रस्त्याच्या बाजूला झाडावर आदळली. त्यात अजिंक्य राजे हे गंभीर जखमी झाले. दिंडोरी पोलिसांच्या गस्त पथकाने त्यांना तातडीने दिंडोरी ग्रामीण रु ग्णालयात नेले मात्र तेथे उपचार सुरू असताना मयत झाले. हे वृत्त समजताच दिंडोरी शहरातील नागरिकांनी ग्रामीण रु ग्णालयात धाव घेतली. अजिंक्य यांनी अल्पावधीत बांधकाम व्यवसायात जम बसवला होता. श्री स्वामी समर्थ टॅक्सी युनियनचे
अध्यक्ष संजय राजे यांचे ते पुत्र होत. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व सात महिन्याचा मुलगा असा परिवार आहे.

दिंडोरी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Dindori industrialists killed in accident