दिंडोरी : दिंडोरी येथे जागतिक आदिवासी गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.येथील बसस्थानकात आदिवासींचे लोकदैवत राघोजी भांगरे, बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांचे पूजन माजी आमदार रामदास चारोस्कर, नगराध्यक्ष रचना जाधव,उपनगराध्यक्ष कैलास मवाळ, माजी उपनगराध्यक्ष सचिन देशमुख,आशाताई कराटे,नगरसेवकमाधवराव साळुंखे, संतोष गांगोडे,भाऊ चारोस्कर, गुलाब जाधव, आदिवासी समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष शांताराम चारोस्कर, तालुकाध्यक्ष मोहन गांगोडे,मित्र मेळा जिल्हाध्यक्ष अरु ण गायकवाड आदींच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी दिंडोरी शहरात भव्य रॅली काढण्यात आली. आदिवासी नृत्य पथकाने नृत्य सादर केले. ढोलपथकाने तालबद्ध ढोल वाजवत लक्ष वेधून घेतले. यावेळी विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला. रॅलीत मोठ्या प्रमाणात समाजबांधवांनी सहभागी होत कार्यक्र माची रंगत वाढवली. सकाळी आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी रॅली काढली.
दिंडोरीत आदिवासी गौरव दिन साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 16:52 IST
आदिवासींचे लोकदैवत राघोजी भांगरे, बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांचे पूजन
दिंडोरीत आदिवासी गौरव दिन साजरा
ठळक मुद्देदिंडोरी शहरात भव्य रॅली काढण्यात आलीढोलपथकाने तालबद्ध ढोल वाजवत लक्ष वेधून घेतले