शेतकरी संघाच्या चेअरमनपदी दिलीप जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2019 19:23 IST2019-09-16T19:22:40+5:302019-09-16T19:23:38+5:30
दिंडोरी : दिंडोरी तालुका शेतकरी सहकारी संघाच्या चेअरमनपदी दिलीप जाधव यांची बिनविरोध निवड झाली.

निवडीबद्दल दिंडोरी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष रचना जाधव, उपनगराध्यक्ष कैलास मवाळ यांच्यासह नगरसेवकांनी त्यांचा सत्कार केला.
दिंडोरी : दिंडोरी तालुका शेतकरी सहकारी संघाच्या चेअरमनपदी दिलीप जाधव यांची बिनविरोध निवड झाली.
शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन गंगाधर निखाडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे चेअरमनपदासाठी निवडणूक घेण्यात आली होती. त्यात चेअरमनपदासाठी दिलीप पंडितराव जाधव यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निबंधक चंद्रकांत विघ्ने यांनी जाधव यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित केले. ही निवड होताच फटाक्याची आतषभाजी व गुलालाची उधळण करीत जल्लोष केला.
यावेळी व्हाईस चेअरमन डॉ. पुंडलिक धात्रक, बाळासाहेब दिवटे, बाळकृष्ण जाधव, खंडेराव संधान, बाळासाहेब गायकवाड, दत्तु हरीकमहाले, मनोहर चौधरी, नवनाथ नाठे, भरत कड, राजाराम सोनवणे, रमेश मवाळ, रामदास पिंगळ, गंगाधर निखाडे आदी उपस्थित होते. निवडीबद्दल दिंडोरी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष रचना जाधव, उपनगराध्यक्ष कैलास मवाळ यांच्यासह नगरसेवकांनी त्यांचा सत्कार केला.