सिन्नर नगरपरिषदेकडून डिजिटल पेमेंट सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 17:11 IST2019-03-14T17:10:06+5:302019-03-14T17:11:45+5:30
सिन्नर : नगरपरिषदेचे कर भरण्यासाठी डीजिटल पेमेंट सुविधा सुरू केली आहे. सदर सुविधा देणारी सिन्नर नगर परिषद ही पहिली नगर परिषद ठरली आहे.

सिन्नर नगरपरिषदेकडून डिजिटल पेमेंट सुविधा
नागरिकांना आता घर बसल्या डेबिट व क्रेडीट कार्डद्वारे कराचा भरणा करता येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी व्यंकटेश दुर्वास, करनिरीक्षक नितीन परदेशी यांनी दिली. सिन्नर नगरपरिषदेद्वारे घरपट्टी-पाणीपट्टी वसुलीबाबत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. त्यानुसार ३१ मार्च २०१९ अखेर १०० टक्के घरपट्टी-पाणीपट्टी वसुली करण्याचे उद्दीष्टे ठेवण्यात आले आहे. नागरिकांच्या सोयीसाठी नागरिकांनी आपल्या डेबिट कार्ड / क्रेडिट कार्डद्वारे डीजिटल पेमेंट करता यावे, याकरीता सिन्नर नगरपरिषदेद्वारे डीजिटल पेमेंट सुविधा तयार करण्यात आली आहे. सिन्नर नगरपरिषद कार्यक्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना घरपट्टी-पाणीपट्टी धारकांनी या सुविधेचा वापर करावा तसेच घरपट्टी-पाणीपट्टी, गाळा भाडे वसुली मोहिमे अंतर्गत नगरपरिषदेचे पथक आल्यास डीजिटल पेमेंट सुविधेद्वारे भरणा करून त्याची रितसर पावती जपून ठेवावी असे आवाहन दूर्वास यांनी केले आहे. सदर घरपट्टी-पाणीपट्टी, गाळा भाडे वसुली मोहीमेस नागरिकांनी सहकार्य करून आपली घरपट्टी-पाणीपट्टी, गाळा भाडे विहित मुदतीत भरणा करावी व पुढील कायदेशीर कारवाईची कटूता टाळावी असे आवाहन दूर्वास यांनी केले आहे.