वाडिवऱ्हे : नाशिक-मुंबई महामार्गावरील राजूर फाट्यावरील पेट्रोल पंपाशेजारी उभ्या वाहनांतून चोरट्यांनी सत्तर हजार रुपये किमतीच्या डिझेलची चोरी करत पोबारा केला. याबाबत वाडिवऱ्हे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.वाडिवऱ्हे पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या नाशिक-मुंबई महामार्गावरील गांधी पेट्रोलपंपाजवळ रात्री विश्रांतीसाठी काही वाहने उभी केली होती, त्यातील दोन कंटेनर आणि एक टिपर या अवजड वाहनातून डिझेलची चोरी झाली असल्याची फिर्याद वाडिवऱ्हे पोलिसांत दाखल झाली आहे.त्यात (एमएच ४६ एएफ ४६४०) या कंटेनरमधील २०० लिटर डिझेल आणि (एमपी ६९ एमएच ०२३७) या कंटेनर ३३० लिटर डिझेल तसेच टिपर (एमएच ०४ जेयू १८८७) मधील २३० लिटर डिझेल असे एकून सत्तर हजार आठशे साठ रुपयांचे डिझेल चोरट्यांनी चोरून नेले आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक आर. डी. आहिरे हे करीत आहेत.
नाशिक-मुंबई महामार्गावर डिझेल चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2022 00:33 IST
वाडिवऱ्हे : नाशिक-मुंबई महामार्गावरील राजूर फाट्यावरील पेट्रोल पंपाशेजारी उभ्या वाहनांतून चोरट्यांनी सत्तर हजार रुपये किमतीच्या डिझेलची चोरी करत पोबारा केला. याबाबत वाडिवऱ्हे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिक-मुंबई महामार्गावर डिझेल चोरी
ठळक मुद्देवाडिवऱ्हे : उभ्या वाहनांतून ७० हजारांचे डिझेल गायब