डिझेल चोरी; दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2020 00:59 IST2020-07-22T21:21:41+5:302020-07-23T00:59:57+5:30
चांदवड : तालुक्यातील रायपूर शिवारात गुंजाळवस्ती येथे मंगळवार मध्यरात्रीच्या सुमारास गस्ती पथकास इंडियन आॅइल कंपनीचे डिझेल वाहतूक करणाऱ्या टॅँकरमधून (क्र. एमएच २१ एक्स ९१९९) डिझेल चोरी करताना टॅँकरचालक शेख मेहमूद शेख सिंकदर व वस्तीवरील राजेंद्र कारभारी गुंजाळ यांना रंगेहाथ पकडले.

या टॅँकरमधील विकी पारधी हा फरार आहे. या प्रकरणी मालेगावचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे, मनमाडचे पोलीस उपअधीक्षक समिरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवडचे निरीक्षक हिरालाल पाटील, मंगेश डोंगरे, विजय जाधव, चंद्रकांत पवार, एस. आर. मोरे, संसारे यांनी छापा टाकून टॅँकरसह १६ लाख ३५ हजार ९१७ रुपयाचा माल ताब्यात घेतला. चांदवड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे.