शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसीच्या अंगावर डिझेल ओतून जिवंत पेटविले ; पिडितेची प्रकृती गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 15:53 IST

नाशिकच्या आडगाव शिवारात राहणाऱ्या तरुणाने प्रेयसी बरोबर झालेल्या वादातून तिच्या अंगावर डिझेल ओतून तिला जिवंत पेटवून दिल्याची धक्कादायक घटना आडगाव शिवारातील दुशिंगे मळ्यात सोमवारी (दि.९) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत प्रेयसी ९० टक्के भाजल्याने तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले

ठळक मुद्देनाशकात प्रेयसीला जीवंत जाळण्याचा प्रकार नव्वद टक्के भाजल्याने पिडितेची प्रकृती चिंताजनकपोलिसांकडून आरोपी प्रियकराला अटक

नाशिक : आडगाव शिवारात राहणाऱ्या तरुणाने प्रेयसी बरोबर झालेल्या वादातून तिच्या अंगावर डिझेल ओतून तिला जिवंत पेटवून दिल्याची धक्कादायक घटना आडगाव शिवारातील दुशिंगे मळ्यात सोमवारी (दि.९) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली असून या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेत प्रेयसी ९० टक्के भाजल्याने तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रेयसीला जिवंत पेटविणाºया प्रियकरावर आडगाव पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताला पोलिसानीअटक केली आहे.येवला तालुक्यातील खामगाव (पाटी) येथे राहणाºया पिडितेच्या भावाने आडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार कोणार्कनगर येथे राहणाºया प्रवीण कृष्णा डोईफोडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत ३२ वर्षीय पिडिता गंभीर भाजल्याने तिची प्रकृती चिंताजणक असून तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोणार्कनगर येथे राहणाऱ्या प्रवीण डोईफोडे व पिडितेचे गेल्या काही दिवसांपासून प्रेमसंबंध होते त्यातून प्रवीणचे पिडिता राहत असलेल्या दुशिंगे मळ्यात घरी येणे जाणे होते.  सोमवारी (दि.९) सायंकाळी संशयित आरोपी प्रवीण पिडितेच्या  घरी आला असताना दोघांत वाद झाले. त्यातून संतापलेल्या प्रवीण याने प्रेयसीच्या अंगावर डिझेल ओतले व त्यानंतर अंगावरचा ड्रेस फाडला व तो गॅसवर पेटवून तिच्यावर टाकून पेटवून दिला. या घटनेत प्रेयसी ९० टक्के भाजली गेली. घटनेनंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आडगाव पोलिसांनी संशयित प्रविण डोईफोडे याला अटक केली आहे. काही महिन्यांपूर्वी पंचवटी फुलेनगरमध्ये अशाच प्रकारे एका प्रियकराने पत्नीसह तिच्या मुलीला व नातिला पेटवून देत जिवंत जाळल्याची घटना उघडकीस आली होती. सोमवारच्या घटनेने जळीतकांडाची पुनरावृत्ती झाली असून दिवसेंदिवस महिवांवरी अत्याचार वाढत असल्याचे दिसून येतआहे.दरम्या, पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश मुळे  या प्रकरणाचा तपास करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNashikनाशिकPoliceपोलिसArrestअटकfireआग