आंतर विभागीय बेसबॉल स्पर्धेत हिरे महाविद्यालयाची बाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 13:30 IST2019-12-27T13:28:59+5:302019-12-27T13:30:34+5:30
हिरे महाविद्यालयाने लासलगाव महाविद्यालयाचा ३-२ ने पराभव करत विजेतेपद पटकाविले.

आंतर विभागीय बेसबॉल स्पर्धेत हिरे महाविद्यालयाची बाजी
नाशिक : लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयातर्फे शिवाजी स्टेडियम येथे आंतर विभागीय महाविद्यालयीनबेसबॉल स्पर्धेचे आयोजन रोजी करण्यात आले होते. यात हिरे महाविद्यालयाने लासलगाव महाविद्यालयाचा ३-२ ने पराभव करत विजेतेपद पटकाविले.
स्पर्धेसाठी पंचवटी महाविद्यालय, केटीएचएम, एच.पी.टी, बिटको सोबत येवला, लासलगाव यांच्या सोबत एकूण १० महाविद्यालयांसह १४० खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. सदर स्पर्धेतून आंतर विद्यापीठाचा संघ निवडला जाणार आहे. लीग राउंडमध्ये झालेल्या स्पर्धेत अंतिम सामना हिरे महाविद्यालय विरु द्ध लासलगाव महाविद्यालय यांच्यात झाला. या सामन्यात हिरे महाविद्यालयाने बाजी मारली. यावेळी जिल्हा क्र ीडा अधिकारी डॉ. रवींद्र नाईक, प्राचार्य डॉ. चंद्रकांत दिगावकर, जिल्हा क्र ीडा सचिव डॉ. दीपक जुदरे, हेमंत पाटील, स्पर्धा सचिव डॉ. संतोष पवार, प्रा.किशोर राजगुरू आदी उपस्थित होते.