शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या कलाविश्वाची अनुभूती देणारी ‘धुंद हवा’

By admin | Updated: August 25, 2016 00:15 IST

दवप्रभा : स्थानिक ५० कलावंतांचा गीतामध्ये सहभाग

नाशिक : धार्मिक, कृषी क्षेत्रात अग्रेसर असण्याबरोबरच कलाविश्वातही समृद्ध असलेले नाशिक जगाच्या नकाशावर पोहचावे आणि नाशिककरांनी जोपासलेल्या अभिजात कलेचे अवघ्या जगाला दर्शन घडावे, या उद्देशाने चित्र, शिल्प, नृत्य व संगीत या चार अभिजात कला केंद्रस्थानी ठेवून स्थानिक पन्नास कलावंतांच्या सोबतीने ‘धुंद हवा’ गीताची निर्मिती करण्यात आली आहे.दवप्रभा प्रॉडक्शनच्या वतीने सुमारे वर्षभर ‘चित्र, शिल्प, नृत्य व संगीत’ या संकल्पनेच्या आधारे शहरातील गोदाघाटापासून तर इगतपुरीच्या विपश्यना केंद्रापर्यंत आणि गंगापूर धरणापासून तर गोंदेश्वर मंदिरांपर्यंत चित्रीकरण करत सुमारे पन्नास कलावंतांच्या सोबतीने ‘धुंद हवा’ हे गीत साकारण्यात आले. या गीताचे प्रथमच बुधवारी (दि.२४) यशवंतराव चव्हाण सायन्स तारांगणामध्ये सादरीकरण करण्यात आले. प्रॉडक्शनच्या प्रमुख व गीताचे दिग्दर्शक प्रा. वृंदा भार्गवे यांनी यावेळी पत्रकारांशी संवाद साधत ‘धुंद हवा’ निर्मितीचा प्रवास उलगडला. या गीताची रचना मिलिंद गांधी यांनी केली, तर प्रशांत महाबळ यांनी त्यांच्या रचनेला संगीताचा साज चढविला आणि मीना निकम, ज्ञानेश्वर कासार, आशिष रानडे या गायकवर्गाने स्वरसुरांची जोड दिली. या सर्व पडद्यामागील कलाकारांच्या प्रयत्नांना अचूक वास्तववादी छायाचित्रणाच्या माध्यमातून फणिंद्र मंडलिक व मार्मिक गोडसे यांनी यशस्वी करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. या गीताच्या निर्मितीला गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यापासून प्रारंभ झाला. छायाचित्रणाला प्रत्यक्ष जानेवारी महिन्यात प्रारंभ करण्यात आला. वर्षभराच्या अथक परिश्रमानंतर नाशिकची ‘धुंद हवा’ अस्तित्वात आल्याचे भार्गवे यांनी यावेळी बोलताना सांगितले. गुरुवारपासून (दि.२५) हे गाणे यू ट्यूब, गुगलवर उपलब्ध होणार आहे. सदर गीत हे साडेपाच मिनिटांचे असून या गीताच्या रचना स्त्री-पुरुष गायकांनी स्वरबद्ध केल्या आहेत. ध्वनी व छायाचित्रणाची सांगड घालत नाशिकरांसाठी गीत साकारले आहे. या गीताच्या माध्यमातून नाशिकचे गुणी कलावंतांची जगाला ओळख होणार आहे. सदर गीतासाठी कुठलेही प्रायोजक घेण्यात आले नसून सर्व नागरिकांना सदर गाणे विनामूल्य उपलब्ध राहणार असल्याचे भार्गवे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)