निफाड न्यायालय आवारातून जन्मठेपेच्या कैद्याने ठोकली धूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 23:43 IST2019-04-04T23:42:58+5:302019-04-04T23:43:34+5:30

निफाड : जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आरोपीने निफाड न्यायालय आवारातून बेडीसह धूम ठोकल्याची घटना गुरुवारी (दि.४) घडली. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे.

Dhumle hit by a prisoner of life from Niphad court | निफाड न्यायालय आवारातून जन्मठेपेच्या कैद्याने ठोकली धूम

आरोपी श्रावण पिंपळे

ठळक मुद्देआरोपी श्रावण पिंपळेने पोलिसांच्या हाताला हिसका देत बेडीसह धूम ठोकली.

निफाड : जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आरोपीने निफाड न्यायालय आवारातून बेडीसह धूम ठोकल्याची घटना गुरुवारी (दि.४) घडली. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे.
निफाड तालुक्यातील नैताळे येथे राहत असलेला श्रावण सुरेश पिंपळे (२२) याच्यावर निफाडसह विविध पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल असून, सध्या तो नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. गुरु वारी अन्य एका गुन्ह्यामध्ये कारागृह पोलिसांनी आरोपी श्रावण पिंपळे यास निफाड न्यायालयात आणले होते. न्यायालय आवारात असतानाच आरोपी श्रावण पिंपळेने पोलिसांच्या हाताला हिसका देत बेडीसह धूम ठोकली. काय झाले हे कळायच्या आत आरोपीने पळ काढला. आरोपीच्या हातात बेडी असून, अंगात काळ्या रंगाचा शर्ट आणि राखाडी रंगाची पॅण्ट आहे.

Web Title: Dhumle hit by a prisoner of life from Niphad court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.