म्हसगण येथे पारंपरिक पद्धतीने धूलिवंदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 23:37 IST2020-03-12T23:29:22+5:302020-03-12T23:37:36+5:30
पेठ : तालुक्यातील म्हसगण येथे पारंपरिक पद्धतीने धूलिवंदन साजरे करण्यात आले असून, आदिवासी संस्कृतीचे रक्षण करणारे उपक्र म सादर करण्यात आले.

म्हसगण, ता. पेठ येथे पारंपरिक सोंगे मुखवटे नाचवत धूलिवंदन साजरे करताना युवक.
ठळक मुद्दे संबळच्या तालावर शेवंती नृत्य, खटखुबा, सोंगाचा नाच, पेरण, तसेच विविध मुखवटे तयार करून दशावतार साजरे केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
पेठ : तालुक्यातील म्हसगण येथे पारंपरिक पद्धतीने धूलिवंदन साजरे करण्यात आले असून, आदिवासी संस्कृतीचे रक्षण करणारे उपक्र म सादर करण्यात आले.
दरवर्षी धुळवडीच्या दिवशी गावातील तरुण, बालकलाकार, महिला मंडळ यांनी कहाळी व संबळच्या तालावर शेवंती नृत्य, खटखुबा, सोंगाचा नाच, पेरण, तसेच विविध मुखवटे तयार करून दशावतार साजरे केले. त्यामध्ये राम, शंकर, पार्वती, विठ्ठल महिलांनी शेवंती नृत्य सादर केले.
यामध्ये देवदत्त चौधरी, सुभाष खंबाईत, विकास खंबाईत, हेमंत गवळी, चंदर चौधरी, गोवर्धन चौधरी, बालकलाकार, कर्ण चौधरी,
अंकुश चौधरी, दीपाली चौधरी, लखन सातपुते आदींनी सहभाग घेतला.