Dhule youth commit suicide in Nashik | धुळ्याच्या युवकाची नाशिकमध्ये आत्महत्या
धुळ्याच्या युवकाची नाशिकमध्ये आत्महत्या

देवळाली कॅम्प : देवळाली रेल्वे स्टेशनजवळ असलेल्या परिसरातील एका जुन्या विहिरीत धुळे येथील निमगूळ गावचा रहिवासी असलेल्या २५ वर्षीय पंकज हेमराज चव्हाण-पाटील या तरुणाने गळ्याला दोराने फास घेत विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी देवळाली कॅम्प पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंदणी घेतली आहे.
येथील जुन्या स्टेशनवाडी परिसरात असलेल्या माळी मळा येथील एका विहिरीमध्ये संपत कासार यांच्या शेतावरील कामगार चंद्रकांत काजळे हे विहिरीजवळ असलेली पाण्याची मोटर सुरू करण्यासाठी गेले असता
विहिरीत गळफास घेतलेल्या अवस्थेत एका युवकाचे प्रेत पाण्यामध्ये तरंगलेल्या अवस्थेत दिसले. त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर त्यास बाहेर काढले.
त्याच्याजवळ आढळून आलेल्या पाकिटातील कागदपत्रांवरून मयताची ओळख पटली आहे. देवळाली कॅम्प पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Web Title: Dhule youth commit suicide in Nashik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.