एसटी कामगार सेनेच्या अध्यक्षपदी धोंगडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:14 IST2020-12-24T04:14:12+5:302020-12-24T04:14:12+5:30

सिन्नर : एसटी कामगार सेना सिन्नर आगाराची २०२१ची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. तालुकाध्यक्षपदी सचिन धोंगडे यांची, तर ...

Dhongade as the president of ST Kamgar Sena | एसटी कामगार सेनेच्या अध्यक्षपदी धोंगडे

एसटी कामगार सेनेच्या अध्यक्षपदी धोंगडे

सिन्नर : एसटी कामगार सेना सिन्नर आगाराची २०२१ची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. तालुकाध्यक्षपदी सचिन धोंगडे यांची, तर कार्याध्यक्षपदी दीपक डोंगरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

विभागीय निरीक्षक तथा विभागीय सचिव देवा सांगळे, शिवसेना शहरप्रमुख गौरव घरटे यांच्या अध्यक्षतेखाली दत्तमंदिर प्रांगणात एसटी कामगार सेना सिन्नर आगाराची बैठक पार पडली. बैठकीत कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली. यामध्ये सचिन धोंगडे (अध्यक्ष), दीपक डोंगरे (कार्याध्यक्ष), दत्ता चव्हाण, परेश वाघ, संजय सोनवणे, श्याम पोरजे (उपाध्यक्ष), सचिन सांगळे, संदीप नागरे, वसंत सानप (सचिव), दयानंद बैरागी (कोषाध्यक्ष), सचिन सी. सांगळे (सहकोषाध्यक्ष), निलेश कर्पे (प्रसिद्धी सचिव), पी. एस. वाघ (संघटक सचिव), अर्चना पांगारकर (महिला प्रतिनिधी), लोकेश चांगले, डी. डी. उगले, जी. जे, घुगे, एस. के, सानप (प्रमुख सल्लागार), सोमा पगार, विश्वास गिते (विभागीय पदाधिकारी) आदी पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली.

----------------

सिन्नर येथे एसटी कामगार सेना सिन्नर आगाराची कार्यकारिणी जाहीरप्रसंगी सचिन धोंगडे, दीपक डोंगरे यांच्यासह सभासद. (२३ सिन्नर १)

===Photopath===

231220\23nsk_6_23122020_13.jpg

===Caption===

२३ सिन्नर १

Web Title: Dhongade as the president of ST Kamgar Sena