सिन्नर एसटी कामगार सेनेच्या अध्यक्षपदी धोंगडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 13:36 IST2020-12-23T13:36:02+5:302020-12-23T13:36:30+5:30
सिन्नर : एसटी कामगार सेना सिन्नर आगाराची २०२१ ची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. तालुकाध्यक्षपदी सचिन धोंगडे यांची तर ...

सिन्नर एसटी कामगार सेनेच्या अध्यक्षपदी धोंगडे
सिन्नर : एसटी कामगार सेना सिन्नर आगाराची २०२१ ची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. तालुकाध्यक्षपदी सचिन धोंगडे यांची तर कार्याध्यक्षपदी दीपक डोंगरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. विभागीय निरीक्षक तथा विभागीय सचिव देवा सांगळे, शिवसेना शहरप्रमुख गौरव घरटे यांच्या अध्यक्षतेखाली दत्तमंदिर प्रांगणात एसटी कामगार सेना सिन्नर आगाराची बैठक पार पडली. बैठकीत कार्यकारणीची एकमताने निवड करण्यात आली. यामध्ये सचिन धोंगडे (अध्यक्ष), दीपक डोंगरे (कार्याध्यक्ष) दता चव्हाण, परेश वाघ, संजय सोनवणे, श्याम पोरजे (उपाध्यक्ष), सचिन सांगळे, संदीप नागरे, वसंत सानप (सचिव), दयानंद बैरागी (कोषाध्यक्ष), सचिन सी. सांगळे (सह कोषाध्यक्ष), निलेश कर्पे (प्रसिद्धी सचिव), पी. एस. वाघ (संघटक सचिव), अर्चना पांगारकर (महिला प्रतिनिधी), लोकेश चांगले, डी. डी. उगले, जी. जे, घुगे, एस. के, सानप (प्रमुख सल्लागार), सोमा पगार, विश्वास गीते (विभागीय पदाधिकारी) आदी पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली.