धोंडबार विद्यालयाच्या शिक्षकांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 18:00 IST2019-06-26T18:00:03+5:302019-06-26T18:00:15+5:30
ॅसिन्नर- तालूक्यातील धोंडबार येथील शिव छत्रपती शिवाजी विद्यालयात शिक्षकांनी विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी बेमुदत उपोषणास प्रारंभ केला.

धोंडबार विद्यालयाच्या शिक्षकांचे उपोषण
ॅसिन्नर- तालूक्यातील धोंडबार येथील शिव छत्रपती शिवाजी विद्यालयात शिक्षकांनी विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी बेमुदत उपोषणास प्रारंभ केला.
गेल्या वीस वर्षांपासून हे शिक्षण आपल्या स्वखर्चातून बसमधून अथवा दुचाकीने शाळेत वेळेवर हजर राहत आहे. गेल्या वीस वर्षात त्यांना मानधन मिळत नाही. काही दिवस सहा हजार रूपये मानधन मिळत होते. मात्र,ते सुद्धा बंद केल्याने जगण्याचा प्रश्न उपस्थित झाल्याने त्यांनी उपोषणाचा मार्ग निवडला आहे. शासन नियमानुसार वेतन व भत्ते मिळावे, मस्टर बंद केलेल्या सह्या घेणे, सन २००१ पासून पीएफ खाते उघडून पीएफची रक्कम जमा करणे, शिक्षकांना सर्व सुविधा उपलब्ध करून देणे, विद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची कामे शिक्षक करतात ते थांबवणे, सेवा ज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापक नेमणे आदी मागण्या आंदोलकांनी केल्या असून त्यास ग्रामस्थांनीही पाठिंबा दिला आहे.