शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

ढिकले भाजपवासी; सानप यांच्या हाती घड्याळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 01:50 IST

गेल्या तीन दिवसांपासून पूर्व नाशिक मतदारसंघातील आमदार बाळासाहेब सानप यांची उमेदवारी कापल्यानंतर आता पक्षाचा उमेदवार कोण? या शक्यतांना विराम देत भाजपने मनसेतून थेट दाखल झालेले अ‍ॅड. राहुल ढिकले यांना उमेदवारी घोषित केली. त्यामुळे नाराज झालेल्या सानप यांनीदेखील शुक्रवारी (दि.४) हातात घड्याळ बांधले आणि राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल केला.

ठळक मुद्देपूर्व नाशिकमधील घडामोडी : एकाच दिवशी पक्षांतरे

नाशिक : गेल्या तीन दिवसांपासून पूर्व नाशिक मतदारसंघातील आमदार बाळासाहेब सानप यांची उमेदवारी कापल्यानंतर आता पक्षाचा उमेदवार कोण? या शक्यतांना विराम देत भाजपने मनसेतून थेट दाखल झालेले अ‍ॅड. राहुल ढिकले यांना उमेदवारी घोषित केली. त्यामुळे नाराज झालेल्या सानप यांनीदेखील शुक्रवारी (दि.४) हातात घड्याळ बांधले आणि राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल केला.भाजपाने तीन दिवसांपूर्वीच पहिली उमेदवारी यादी घोषित केली. त्यात विद्यमान आमदार बाळासाहेब सानप यांचे नाव नव्हते. उमेदवारीच्या पक्षांतर्गत स्पर्धेत स्थायी समितीचे सभापती उद्धव निमसे आणि मनसेचे अ‍ॅड. राहुल ढिकले यांचे नाव आघाडीवर होते. त्यानंतर ढिकले की सानप, असा प्रश्न कायम होता. गुरुवारी तिसरी चौथी यादी भाजपाने घोषित केली तरी त्यात सानप यांचे नाव नव्हते दुसरीकडे राहुल ढिकले यांचा भाजपा प्रवेश सोहळा होऊन त्यांना उमेदवारी देणार अशी चर्चा असताना पक्षात अधिक वाद वाढू नये यासाठी पक्षाने एबी फॉर्म देऊन थेट मुंबईहून नाशिकला रवाना केले. त्यामुळे मध्यरात्री त्यांनी आपल्याला उमेदवारी मिळाल्याचे सांगितले. त्यामुळे तेव्हा सानप यांचा पत्ता कट झाल्याच्या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले. दरम्यान, सानप हेदेखील आपल्या संभाव्य उमेदवारी नाकारण्याच्या चर्चेने तयारीत होतेच. राष्टÑवादी कॉँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या संपर्कात ते होते. त्यांना दुपारी राष्टÑवादी कॉँग्रेसने उमेदवारीचा एबी फॉर्म दिला आणि त्यांनीदेखील या पक्षाकडून अर्ज दाखल केला आहे. सानप यांना उमेदवारी नाकारण्याच्या शक्यतेने त्यांचे समर्थक दोन दिवस संपर्क कार्यालयात येऊन ठाण मांडून बसत होते, तर सानप यांनी बंडखोरी करू नये, यासाठी समजूत काढण्याचेदेखील प्रयत्न सुरू होते.‘त्यांनी’ उत्तर देणे टाळले...भाजपने निवडणूक पूर्व केलेल्या सर्वेक्षणात माझी कामगिरी उत्तम असल्याचे दिसल्याने भाजपने मला उमेदवारी दिली असे सांगणाऱ्या राहुल ढिकले यांनी मनसेत असता तर उमेदवारी मिळाली असती का? असे विचारल्यावर त्यांनी उत्तर देणे टाळले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nashik-east-acनाशिक पूर्वBalasaheb Sanapबाळासाहेब सानपMNSमनसेBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस