धटिंगण यांचा आभा काव्य व्हिडिओ प्रकाशित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:45 IST2021-01-08T04:45:00+5:302021-01-08T04:45:00+5:30

शब्द, सूर, ताल यांचा सुरेख संगम यात जुळून आला असून, त्याला रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळेल, असा विश्वास त्यांनी ...

Dhatingan's aura poetry video published | धटिंगण यांचा आभा काव्य व्हिडिओ प्रकाशित

धटिंगण यांचा आभा काव्य व्हिडिओ प्रकाशित

शब्द, सूर, ताल यांचा सुरेख संगम यात जुळून आला असून, त्याला रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी विश्वास ठाकूर म्हणाले की, निर्मिती व गुणवत्तेच्या बाबतीत ‘आभा’ व्हिडिओ परिपूर्ण आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा दर्जेदार व्हिडिओ पोहोचावा, असा मानस त्यांनी व्यक्त केला. या व्हिडिओमध्ये प्रख्यात नृत्यांगना डॉ. सुमुखी अथणी यांचा कवितेच्या अंगाने केलेला लालित्यपूर्ण पदन्यास व्हिडिओची रंगत वाढवणारा आहे. मनोज गुरव यांची बासरी आणि शुभम जोशी यांचे ध्वनिमुद्रण, आदित्य रहाणे यांचे संकलन आहे. पं जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य संगीतकार आणि गायक मकरंद हिंगणे यांचे मार्गदर्शन या गीतासाठी लाभले आहे. दिग्दर्शन आणि निर्मिती निनाद गायधनी यांची आहे.

Web Title: Dhatingan's aura poetry video published