पंचवटीत धर्मनाथ बीज, नाथ दीक्षा संपन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 00:20 IST2020-02-02T23:47:09+5:302020-02-03T00:20:50+5:30

धर्मनाथ बीज उत्सव समितीतर्फे दरवर्षीप्रमाणे रविवारी पंचवटीत धर्मनाथ बीज उत्सव समिती व नाथ दीक्षा कार्यक्र म संपन्न झाला. उत्सवाचे यंदा १२ वे वर्ष होते. पाथरवट समाज मंगल कार्यालयात धर्मनाथ बीज, नाथ दीक्षा, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

Dharmanath Seed, Nath initiation completed in Panchavati | पंचवटीत धर्मनाथ बीज, नाथ दीक्षा संपन्न

धर्मनाथ बीज उत्सव व नाथ दीक्षाप्रसंगी महंत योगी सूरजनाथ, महंत योगी पीर गणेशनाथ आदींसह शिष्यगण व भाविक.

पंचवटी : धर्मनाथ बीज उत्सव समितीतर्फे दरवर्षीप्रमाणे रविवारी पंचवटीत धर्मनाथ बीज उत्सव समिती व नाथ दीक्षा कार्यक्र म संपन्न झाला. उत्सवाचे यंदा १२ वे वर्ष होते. पाथरवट समाज मंगल कार्यालयात धर्मनाथ बीज, नाथ दीक्षा, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्र माला महंत योगी सूरजनाथ, त्र्यंबकेश्वर मठाचे महंत योगी पीर गणेशनाथ यांच्या प्रमुख हस्ते श्री गोरक्षनाथाच्या मूर्तीचे पूजन करून परिसरातून सवाद्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर नाथ दीक्षा कार्यक्र म झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार हेमंत गोडसे, आमदार राहुल ढिकले, माजी आमदार बाळासाहेब सानप, भाजप नेते सुनील बागुल, पोलीस निरीक्षक अशोक भगत आदी उपस्थित होते.
यावेळी नाशिकसह राज्यभरातील बांधवांनी नाथ दीक्षा घेतली. कार्यक्र माला समिती अध्यक्ष नीलेश जाधव, संदीप महाले, किशोर जाधव, प्रदीप खर्डे, विनायक चव्हाण, मच्छिंद्र इंगळे, विनोद शिंदे, योगेश गायकवाड, सुभाष वंजारी, रवींद्र सूर्यवंशी, संजय महाले, सुभाष लेवे, आदी उपस्थित होते.

Web Title: Dharmanath Seed, Nath initiation completed in Panchavati