शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

मनुष्याच्या जीवनात  धर्मच सुखकारक : सुरीश्वरजी महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 01:16 IST

विधीपूर्वक आणि अविधी दूर करून मनाचा शुद्ध आशय बाळगून केलेला धर्मच इहलौकिक आणि परलौकिक सुखाचं कारण ठरू शकते, असे प्रतिपादन गच्छाधिपती जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांनी केले.

नाशिकरोड : विधीपूर्वक आणि अविधी दूर करून मनाचा शुद्ध आशय बाळगून केलेला धर्मच इहलौकिक आणि परलौकिक सुखाचं कारण ठरू शकते, असे प्रतिपादन गच्छाधिपती जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांनी केले.लॅमरोड बालगृहरोड येथील कलापूर्णम् धाममध्ये सुरू असलेल्या उपधान तपाच्या प्रवचनात बोलताना जैनाचार्य सुरीश्वरजी महाराज म्हणाले की, धर्मक्रियेत भावनादेखील एकत्रित असावी त्यामुळे धर्मक्रियेत शुभध्यान करता येते. आज आपण धर्मापेक्षा धनाची किंमत अधिक मानतो म्हणूनच धन कमविण्यासाठी धर्माची आहुती देतो. दुकानात वेळेवर जाणारा कधी प्रवचनात जातो का? कदाचित वेळेवर दुकानी पोहचले नाही तर एखाद्या दिवशी नुकसान होईल, पण येथे चालू असलेल्या उपधानमध्ये सकाळ, दुपारच्या दोन्ही प्रवचनात जर उशिरा पोहचले तर जे नुकसान होईल त्याचा कुठे हिशोब लागणार नाही, असे जैनाचार्य सुरीश्वरजी यांनी सांगितले.धर्म कसा करावा व शुद्ध धर्माचे फळ काय? याचे स्पष्टीकरण देताना शालिभद्रच्या कथेतील आई व मुलगा संगमचे रडणे ऐकून जमलेल्या महिलांना मुलाला खीर खाण्याची इच्छा पूर्ण करू शकत नसल्यामुळे रडत असल्याचे समजले. महिलांनी शेजारधर्म म्हणून आईचे सांत्वन करून आम्ही सर्व मिळून बाळाची खीर खाण्याची इच्छा पूर्ण करतो, असे सांगितले.संकुचित वृत्ती धारण करणारी व्यक्ती कधीही इतरांचा विचार करूच शकत नाही आणि खऱ्या अर्थाने स्वत:चे आत्मकल्याण सुद्धा प्राप्त करू शकत नाही. पुर्वी घराबाहेर लिहिलेले असायचे ‘अतिथी देवो भव’ आणि आज घराबाहेर बोर्ड आढळतात ‘कुत्र्यापासून सावधान, परवानगी शिवाय प्रवेष निषेध’ असे बोर्ड लावुन आपण आपलेच कल्याण रोधित करीत आहोत असे जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराजा यांनी सांगितले.

टॅग्स :Nashikनाशिक