धनूर्मास प्रारंभ जगदंबेची विशेष पुजा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 18:32 IST2019-12-29T18:31:53+5:302019-12-29T18:32:36+5:30
वणी : प्रात: समयी जगदंबा देवीला पंचामृत महापुजा करण्यात आली . तद्नंतर विशेष सजावट भगवतीची करण्यात आली. सुवर्णलंकार नविन महावस्त्र स्वरुपातील पैठणी कपाळावर चंद्रकौर नाकात नथ गळ्यात मंगळसुत्र कानात कर्णफुले असा साजशृंगार करण्यात आला होता देवीला तीळ व बाजरीची भाकरी, लोणी, तांदळाची खिचडी, वांग्याचे भरीत याचा नैवेद्य दाखविण्यात आला.

धनूर्मास प्रारंभ जगदंबेची विशेष पुजा
लोकमत न्युज नेटवर्क
वणी : प्रात: समयी जगदंबा देवीला पंचामृत महापुजा करण्यात आली . तद्नंतर विशेष सजावट भगवतीची करण्यात आली. सुवर्णलंकार नविन महावस्त्र स्वरुपातील पैठणी कपाळावर चंद्रकौर नाकात नथ गळ्यात मंगळसुत्र कानात कर्णफुले असा साजशृंगार करण्यात आला होता देवीला तीळ व बाजरीची भाकरी, लोणी, तांदळाची खिचडी, वांग्याचे भरीत याचा नैवेद्य दाखविण्यात आला.
धनुर्मासच्या कालावधीत प्रत्येक रविवारी अशा पद्धतीच्या नैवेद्याचे नियोजन असते सुर्यनारायणाचे किरण जगदंबेच्या मुखकमलावर येतात व याच्या आनंदाची अनुभुती दर्शनार्थी घेतात तसेच सुर्यनारायण जगदंबेची भेट घेण्यासाठी येतात अशी भाविकांची भावना आहे.
मात्र गेल्या दोन दिवसांपासुन ढगाळ वातावरण असल्याने सुर्यदर्शन झाले नाही त्यामुळे भाविकांचा हिरमोड झाला. दरम्यान २४ वर्षापासुन धनुर्मास उत्सव साजरा करण्यात येत असुन या परंपरेचे जतन करण्यासाठी जगदंबा देवी संस्थानचे अध्यक्ष राजेन्द्र थोरात पुजारी सुधीर दवणे व विश्वस्त प्रयत्नशील आहेत.
(फोटो २० जगदंब)