शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

धनश्रीचे धाडस छान, मोराचे वाचविले प्राण

By admin | Updated: June 24, 2014 00:28 IST

सिन्नर : sमोरावर हल्ला करणाऱ्या कुत्र्यांना हुसकावले आणि मोराचे प्राण वाचवले.

सुनील थोरात ल्ल सिन्नरसूर्याच्या सोनेरी किरणांनी पूर्व दिशा उजळू लागलेली असतानाच रम्य सकाळी राष्ट्रीय पक्षी मोराचा टाहो ऐकू येण्याऐवजी संकटातील मयूरराजाचे केकालणे आणि कुत्र्यांचे भुंकणे यामुळे एकच गलका झाला. हा गलका ऐकून घराबाहेर उभ्या असलेल्या धनश्रीचे लक्ष मोरावर हल्ला करणाऱ्या कुत्र्यांकडे गेले. ते पाहून तिने धाव घेऊन मोरावर हल्ला करणाऱ्या कुत्र्यांना हुसकावले आणि मोराचे प्राण वाचवले. सिन्नर तालुक्यातील मनेगाव शिवारातील शिंदे वस्तीजवळ रविवारी सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. वस्तीजवळच नेहमी येणारे मोर पाहून आनंदित होणाऱ्या धनश्री साहेबराव शिंदे या दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या चिमुकलीने एका मोरावर कुत्र्यांचा प्राणघातक हल्ला होत असल्याचे ओळखून त्यांना पिटाळून लावण्यासाठी प्रयत्न केला खरा; तथापि, कुत्र्यांनी तिच्याकडे दुर्लक्ष केले. कुत्रे माघार घेत नसल्याचे पाहून धनश्रीने आरडाओरड केल्याने घरात असलेली तिची आई मीरा व वडील साहेबराव शिंदे, काकू कविता नितीन शिंदे, शीतल शिंदे यांनी घरातून बाहेर येऊन पाहिल्यावर मोराला वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या धनश्रीला मदत करण्यासाठी तत्काळ धाव घेतली. त्यामुळे कुत्र्यांनी पळ काढला. तोपर्यंत कुत्र्यांनी मोराच्या पायाला, दोन्ही पंखांना जखमा केल्या होत्या. जखमी मोराला उचलून त्यांनी घराजवळ आणले. त्याच्या जखमांवर हळदीचे लेपण करून तांदूळ आणि पाणी पाजल्यावर मोराला थोडी तरतरी आली. या हल्ल्याची माहिती त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना दिली. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने मनेगावच्या शिंदेवस्तीवर धाव घेऊन जखमी मोराला ताब्यात घेतले. सिन्नर येथे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्यावर उपचार केल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली. (वार्ताहर)