नासिक जिमखान्याच्या धनश्रीला दुहेरी विजेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:26 IST2021-03-04T04:26:26+5:302021-03-04T04:26:26+5:30
नाशिक : गुजरातमधील राजकोट येथे नुकत्याच दि. २४ ते २८ फेब्रुवारीदरम्यान झालेल्या ऑल इंडिया लॉन टेनिस टॅलेंट सिरीजमध्ये ...

नासिक जिमखान्याच्या धनश्रीला दुहेरी विजेतेपद
नाशिक : गुजरातमधील राजकोट येथे नुकत्याच दि. २४ ते २८ फेब्रुवारीदरम्यान झालेल्या ऑल इंडिया लॉन टेनिस टॅलेंट सिरीजमध्ये १४ वर्षांखालील वयोगटात नासिक जिमखान्याच्या धनश्री लक्ष्मण पाटीलने एकेरीत अहमदाबादच्या प्रिया मिश्री हिचा ६-२, ६-४ असा पराभव करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. तसेच दुहेरीत राजकोटच्या हिरवा रांगाते हिच्या साथीने अहमदाबादच्या ऐंशीया आणि वंडांशी शहा यांचा ७-५, ५-७, १०-८ अशा फरकाने विजय मिळवत अशा दोन्ही गटांत विजेतेपद पटकावले.
संस्थेचे टेनिस प्रशिक्षक जयंत कर्पे व मयूर खरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली धनश्री नासिक जिमखान्यात नियमित टेनिसचे सराव करते. या विजयाबद्दल धनश्री हिचा संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कार्याध्यक्ष प्रकाश सिकची, सहसचिव शेखर भंडारी, मिलिंद जोशी, व्यवस्थापक संजय मराठे, टेनिस प्रशिक्षक जयंत कर्पे व मयूर खरोटे उपस्थित होते.
फोटो कॅप्शन (०३टेनीस)
टॅलेंट सिरीजमधील विजेती धनश्री पाटीलचा सत्कार करताना नरेंद्र छाजेड. प्रकाश सिकची, शेखर भंडारी, मिलिंद जोशी, संजय मराठे, जयंत कर्पे आदी.